24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृतीकुराणातील आयती संबंधात न्यायालयीन लढा व वस्तुस्थिती

कुराणातील आयती संबंधात न्यायालयीन लढा व वस्तुस्थिती

Google News Follow

Related

अलीकडेच उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष सय्यद वासिम रिझवी यांनी कुराणातील काही आयती संदर्भात केलेला एक अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.

कुराणातील काही विशिष्ट आयती, (सुमारे २६) ह्या इतर धर्मीयांविषयी द्वेष किंवा शत्रुभावना पसरवतात, तसेच इतर धर्मीयांविरुद्ध हिंसाचारास उत्तेजन देतात, असे याचिका कर्त्यांचे म्हणणे होते. मदरशांमध्ये लहान मुलांना कुराण शिकवले जाते, तेव्हा त्यातील अशा आयत्यांमुळे त्यांच्या संवेदनक्षम मनांवर चुकीचे संस्कार होऊन, ती इतर धर्मीयांविषयी चुकीची, शत्रुत्वाची भावना बाळगू शकतात. तेव्हा हे टाळण्यासाठी मदरशांत शिकवल्या जाणाऱ्या कुराणातून ह्या हिंसाचारास उत्तेजन देणाऱ्या आयती वगळल्या जाव्यात, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांनी मुख्यतः हे मांडले होते, की इस्लामी दहशतवादी संघटना इतर धर्मियांविरुद्ध केल्या जाणाऱ्या हिंसाचाराला जे वैचारिक समर्थन देतात, त्याचा मूळ स्रोत व आधार दुर्दैवाने कुराणातील या सव्वीस आयत्यांमध्ये सापडतो. यात मुख्यतः गैर मुस्लिमांनी मुस्लिमांवर केलेल्या कथित अन्यायाचा सूड म्हणून त्यांच्या हत्या करणे, त्यांच्या विरुद्ध सशस्त्र जिहाद, – यांना इस्लामची संमती / मंजुरी असणे, शरियत कायद्याचा बळाने वापर करून इस्लामची स्थापना, सध्याच्या (संसदीय लोकशाहीच्या जागी) इस्लामिक राज्याची (खिलाफतीची) स्थापना, इस्लामसाठी लढताना मृत्यू आल्यास जिहादी शहीदाला जन्नतची प्राप्ती खात्रीपूर्वक होणे, इस्लाम इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ असणे, इत्यादी गोष्टी येतात. या सव्वीस आयतींमुळे लहान वयातच मुले मूलतत्त्ववादी / कट्टर बनतात, (Indoctrination) जे देशाची एकता, अखंडता, शांती आणि सांप्रदायिक सद्भावना यांना हानिकारक आहे.

हे ही वाचा:

पुन्हा एकदा संकट काळात संघाची मदत

दिल्लीत लॉकडाउनआधी तळीरामांची गर्दी

भारत सरकारकडून ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ला अर्थसहाय्य

ट्वीटरवर गाजला ‘अरेस्ट साकेत गोखले’ ट्रेंड

कुराणातील संबंधित आयती :

कुराण मजीद ग्रंथातील संबंधित आयतींचा मजकूर (अर्थासह) पूर्ण दिल्यास लेख फार लांबेल; त्यामुळे केवळ सुरा व आयत यांचे क्रमांक इथे देत आहे:

सुरा ९ – आयत ५, १४, २८, १२३, २३, ३७, २९, ५८, १११. सुरा ४ – १०१, ८९, ५६. सुरा ५ – १४, ५१, ५७. सुरा ३३ – आयत ६१. सुरा २१ – आयत ९८. सुरा ३२ – आयत २२. सुरा ४८ – आयत २०. सुरा ८ – ६५, ६९. सुरा ६६ – आयत ९. सुरा ४१ – आयत २७, २८.

या याचिकेची पार्श्वभूमी:

याचे मूळ १९८५ साली कलकत्ता उच्च न्यायालयात चंदनमल चोप्रा आणि शीतल सिंह यांनी कुराणाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत आहे. कुराणातील आयत्यांमध्ये सांप्रदायिक सद्भाव धोक्यात येईल, अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील, असे लिखाण असल्यामुळे भारतीय दंड विधान कलम १५३(अ) आणि २९५ (अ) नुसार तो फौजदारी गुन्हा ठरतो. त्यामुळे कुराण या ग्रंथावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. न्यायमूर्ती खस्तगीर यांनी ती याचिका दाखल करून घेतली. मात्र पुढे त्यांच्यावर पुष्कळ दबाव येऊन त्यांच्याकडून ती याचिका काढून घेतली गेली. पुढे न्यायमूर्ती बिमलचन्द्र बसाक यांच्याकडून ती याचिका २१.०६.१९८५ रोजी फेटाळली गेली.

त्यानंतर इतिहासतज्ञ सीताराम गोयल आणि चंदनमल चोप्रा यांनी “द कलकत्ता कुरान पिटीशन १९८५” असे एक पुस्तक प्रकाशित केले, ज्यात या खटल्याची सर्व हकीकत देऊन, मतांसाठी केल्या जाणाऱ्या मुस्लिमअनुनयावर, तुष्टीकरणावर भाष्य केले. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हिंदू रक्षा दलाचे अध्यक्ष इंद्र सेन शर्मा, (जे त्यावेळी अखिल भारतीय हिंदू महासभेचे उपाध्यक्ष होते) आणि सचिव राजकुमार आर्य यांनी कुराणातील संबंधित आयती छापून “Why riots take place in the country ?” अशा शीर्षकाची एक पुस्तिका प्रसिद्ध केली, ज्यात कुराणातील ह्या आयती उद्घृत केल्या होत्या. त्यावरून त्या दोघांना अटक होऊन, त्यांच्याविरुद्ध दिल्ली मेट्रोपोलिटन माजीस्ट्रेट समोर खटला चालला होता. या दोघांवर ठेवण्यात आलेले आरोप भारतीय दंड विधान कलम १५३ (अ) आणि कलम २९५(अ) खाली – म्हणजे सांप्रदायिक अशांती निर्माण करणे, व जाणीवपूर्वक एखाद्या धर्माची निन्दा नालस्ती करून त्यांच्या विषयी द्वेष भडकवणे – हे होते. (इथे गम्मत म्हणजे, मुळात चंदनमल चोप्रा यांनी कलकत्ता कुराण पिटीशन केसमध्ये अगदी याच कलमांखाली ‘कुराणा’वर बंदी घालण्याची मागणी केली होती.) पब्लिक प्रोसिक्युटर चा मुख्य भर हा होता, की त्या पुस्तिकेत उद्घृत केलेल्या आयती एकतर मूळ कुराणात नाहीतच, किंवा कुराणातील आयतींच्या चुकीच्या विकृत आवृत्त्या (Distorted versions) आहेत.
त्या खटल्यात मेट्रोपोलिटन माजीस्ट्रेट झेड. एस. लोहाट यांनी दिलेला निर्णय लक्षात घेण्यासारखा आहे. दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करणाऱ्या आपल्या ३१ जुलै १९८६ च्या निकालात ते म्हणतात :
“कुराण मजीद या ग्रंथाविषयी यथोचित आदर व्यक्त करून, आणि संदर्भित आयतींचे काळजीपूर्वक वाचन करून आम्ही या निष्कर्षाला येतो, की ह्या आयती क्लेशकारक असून, त्या द्वेष पसरवतात, व एकीकडे मुस्लीम समाज आणि दुसरीकडे इतर अन्य समाज यांमध्ये भेदभाव, तणाव उत्पन्न करू शकतात. मी स्वतः ‘संदर्भित आयती’ आणि ‘कुराण मजीद’ चे मोहम्मद फारुख खान यांनी केलेले हिंदी भाषांतर यांची तुलना करून या निष्कर्षाला पोचलो आहे, की संदर्भित आयती या मूळ कुराण मजीद मध्ये जशा आहेत, तशाच पोस्टर मध्ये दिलेल्या आहेत.पोस्टर मधील आयती, आणि मूळ ग्रंथातील आयती यांचे काळजीपूर्वक वाचन केल्यास हे लक्षात येते, की दोन्हींच्या अर्थात काहीही फरक नाही, किंवा हेतुतः त्यात काही फरक केला गेल्याचे आढळत नाही. त्यामुळे मी सन्मान्य सहायक पब्लिक प्रोसिक्युटर यांच्या या मताशी सहमत नाही, की संदर्भित आयती ह्या ‘कुराण मजीद’ मधील नाहीत, किंवा त्या कुराण मजीद मधील आयतींच्या चुकीच्या आवृत्त्या (Distorted versions) आहेत. ह्या चर्चेनंतर मी या निर्णयाप्रत आलो आहे, की दोन्ही आरोपींविरोधात सकृद्दर्शनी कुठलाही पुरावा नसून, त्यांच्या विरोधात केले गेलेले आरोप हे सकृद्दर्शनी कलम 153 A / 295 A च्या चौकटीत बसत नाहीत; त्यामुळे दोन्ही आरोपी ना आरोपातून मुक्त करण्यात येत आहे. (३१ जुलै १९८६)

हे ही वाचा:

साकेत गोखले यांच्याविरोधात तक्रार दाखल

ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे देणार का?

कशी आली केंद्राची ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या मदतीला?

महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर

राज्यघटनेत अनुच्छेद २५ नुसार देण्यात आलेल्या “धर्म स्वातंत्र्या”च्या मुलभूत हक्कानुसार जरी ही (सय्यद वासिम रिझवी यांची) याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळली गेली असली, तरी इथे हे लक्षात घ्यावे लागेल, की त्याच अनुच्छेदानुसार या स्वातंत्र्याचा उपभोग – सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, व आरोग्य यांच्या अनुषंगाने करावयाचा आहे. तसेच हे धार्मिक स्वातंत्र्य इतर धर्मियानाही सारखेच उपलब्ध आहे. जर एखादा विशिष्ट धर्मग्रंथ इतर धर्मीयांना घटनेने दिलेले स्वातंत्र्य नाकारत असेल, तर ते भारतीय राज्यघटने ला मान्य होऊ शकत नाही. त्यामुळे, आणि दिल्ली मेट्रोपोलिटन माजीस्ट्रेट झेड. एस. लोहाट यांनी दिलेल्या वरील निर्णयाच्या संदर्भात यावर अधिक विचारमंथन गरजेचे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा