‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद

‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद

भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लीना यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मीना यांनी ‘काली’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. या फिल्मच्या पोस्टरवर माता कालीला सिगारेट ओढताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हे पोस्टर वादात सापडले असून लीना मणिमेकलाई यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

लीना मणिमेकलाई यांनी २ जुलै रोजी ‘काली’ या माहितीपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. या चित्रपटात माता कालीला सिगारेट ओढताना दाखवलं असून तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात एलजीबीटी समुदायाचा रंगीत ध्वज दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:

शिकागोमधल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये; पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याची घोषणा

आदित्य ठाकरेंना वगळून शिवसेनेच्या १४ आमदारांना व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस

मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी; रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका

निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टरमध्ये निर्मात्यांनी माता कालीचा अपमान केल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच लीना मणिमेकलाई यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी लीना मणिमेकलाई यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. ट्विटरवर #arrestleenamanimekalai हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

Exit mobile version