आदिवासींचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र; दोघांना अटक

आदिवासींचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र; दोघांना अटक

छत्तीसगडमधील जशपूरमध्ये धर्मांतराचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. स्थानिक लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी एका पास्टरसह दोघांना अटक केली आहे. पास्टर क्रिस्टोफर टिर्की आणि ज्योती प्रकाश टोप्पो अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारीनंतर त्यांना बगिया ग्रामपंचायतीच्या भालुटोला परिसरातून अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिर्की आणि टोप्पो, यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील टोप्पोच्या घरी स्थानिक आदिवासींचे ख्रिश्चन धर्मात कथित रूपांतर केले जाते, अशी माहिती पोलिसांना लागली आहे. आयपीसीच्या कलम २९५ अ आणि ३४ आणि धर्म स्वातंत्र्य कायद्याच्या कलम ४ अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ मार्च रोजी झालेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंच्या प्रार्थना सभेत कंवर जमातीतील २५ कुटुंबातील ६८ जणांचा सहभाग असल्याचा आरोप, विश्व हिंदू परिषदेचे विभागीय सहमंत्री राजेश गुप्ता यांनी केला आहे. धर्मांतर रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच हिंदू संघटनाही धर्मांतर करणाऱ्यांना सतत सल्ले देऊन धर्मांतर रोखत आहेत. हा सर्व प्रकार भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष विष्णुदेव साई यांच्या गावात घडला होत आहे. यासंदर्भात राजेश गुप्ता यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष विष्णुदेव साईंशी चर्चा केल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

ड्रेनेज टाकीत गाय पडली आणि…

“हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, देवाचो सोपूत घेता की…”

अल्पसंख्य हिंदूंना अल्पसंख्य घोषित करण्याचा अधिकार राज्यांना

रमापती शास्त्री यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती!

पोलिसांनी ख्रिस्तोफर टिर्की आणि ज्योती प्रकाश टोप्पो यांच्यासह दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. तेथून दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीवर रवानगी करण्यात आली आहे. मात्र फेलोशिप ऑफ पेंटेकोस्टल चर्चेस इन इंडिया (FPCGI) चे सदस्य पास्टर सुधीर तिर्की यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Exit mobile version