राम मंदिराबद्दलची काँग्रेसची भूमिका उदासीन, गुजरातच्या काँग्रेस आमदाराचा राजीनामा

गुजरात विधानसभेत काँग्रेसकडे राहिल्या १५ जागा

राम मंदिराबद्दलची काँग्रेसची भूमिका उदासीन, गुजरातच्या काँग्रेस आमदाराचा राजीनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. राम मंदिर सोहळ्याप्रति काँग्रेसच्या भूमिकेवरून गुजरातचे काँग्रेसचे आमदार सीजे छावडा यांनी त्यांच्या आमदारकीचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे.

विजापूर मतदारसंघातून तीनवेळा आमदार झालेल्या छावडा यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष शंकर चौधरी यांना गांधीनगरमध्ये सुपूर्द केला. ‘मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेसमध्ये २५ वर्षे काम केले. मात्र राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आनंदाचे भरते आले असताना, सर्व नागरिकांच्या या उत्साहात सहभागी होण्याऐवजी काँग्रेसची विरोधी भूमिका उदासीन आहे,’ अशा शब्दांत त्यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

अयोध्येतील सोहळ्याचे ‘त्या’ पाच न्यायाधीशांना निमंत्रण

अमेरिकेचा येमेनमधील हुती दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला

राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रिलायन्स उद्योगाकडून सुट्टी जाहीर

किशोरी पेडणेकर, रोहित पवारांना ईडीकडून समन्स

‘आपण गुजरातचे दोन मोठे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची कामे आणि धोरणांना पाठिंबा दिला पाहिजे. मात्र मी काँग्रेसमध्ये असेपर्यंत हे करू शकत नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

छावडा यांच्या राजीनाम्यामुळे १८२ जागांच्या गुजरात विधानसभेत काँग्रेसकडे अवघ्या १५ जागा शिल्लक राहिल्या आहेत. छावडा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
याआधी आणंद जिल्ह्यातील खंभाट मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चिराग पटेल यांनीही त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.

Exit mobile version