रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचे की नाही?

काँग्रेससमोर पेच; विहिंपची टीका

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचे की नाही?

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला जायचे की नाही, या पेचात सध्या काँग्रेस अडकली आहे. इंडिया गटाचा सहकारी पक्ष माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. ममता बॅनर्जीही अयोध्येला जाणार नाहीत. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी अजून जायचे की नाही, हे ठरवलेले नाही. अखिलेश यादव यांनी आमंत्रण मिळाल्यास जाऊ, असे सांगितले आहे. त्याचवेळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीदेखील आमंत्रण मिळाल्यास नक्की जाऊ, असे स्पष्ट केले आहे.

केरळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी सांगितले की, काँग्रेसमधून केवळ चार व्यक्तींनाच वैयक्तिक आमंत्रण देण्यात आले आहे. याबाबत सर्वांनी वैयक्तिक निर्णय घ्यावा मात्र पक्षाने सामूहिकपणे काही निर्णय घेतला असल्यास तोही सर्वांनी मानला पाहिजे, असे मत थरूर यांनी मांडले आहे. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यास उपस्थित राहायचे की नाही, हे लोकांच्या तार्किक निवडीवर सोडून दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. माकपच्या निर्णयावरही त्यांनी मत मांडले. ते कोणत्याही धर्माला मानत नसल्याने त्यांच्यासाठी निर्णय घेणे सोपे आहे, असेही थरूर म्हणाले.

हे ही वाचा:

कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती!

करणी सेना प्रमुखावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोजर!

ठाकरे गटाला २३ जागा मग आम्हाला काय? काँग्रेसचा सवाल!

दहशतवादी हाफिज सईदला आमच्या स्वाधीन करा!

‘काँग्रेसचा बुरखा फाटला’

काँग्रेसच्या इंडियन ओव्हरसीज संघटनेचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी संपूर्ण देश राम मंदिरात अडकला गेल्याची टीका केली होती. तसेच, पंतप्रधान राम मंदिरात फेऱ्या मारत आहेत. उलट त्यांना ग्रंथालय, विज्ञान केंद्र आणि शाळांमध्ये जायला पाहिजे, असे शरसंधान केले होते. मात्र विश्व हिंदू परिषदेने या वक्तव्यावर टीका केली आहे. ‘पित्रोदा यांनी काँग्रेसच्या वास्तवातील चेहऱ्यावरून बुरखा फाडला आहे. काँग्रेसला याचा त्रास होतोय की, पंतप्रधान राम मंदिरात का जात आहेत? अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जावे, असे काँग्रेसला वाटत नाही. आता राम मंदिर साकारत असताना त्यापासून काँग्रेस दूर राहात आहे,’ अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी केली आहे.

Exit mobile version