कर्नाटकात पुन्हा एकदा हिजाब वादाचा मुद्दा पेटला आहे. कर्नाटकमधील उडुपीमध्ये महाविद्यालयात हिजाब घातलेल्या सहा विद्यार्थीनींना यापूर्वी वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. आता पुन्हा एकदा कर्नाटकात हिजाबवरून वाद सुरू झाला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये मुस्लीम महिला विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने परवानगी दिली आहे.
“भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. लोकांना हवे तसे कपडे घालायचे त्यांना स्वातंत्र्य आहे,” असं म्हणत उच्च शिक्षण मंत्री एम. सी. सुधाकर यांनी हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, हिंदुत्त्ववादी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.
हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगितले जाईल, अशी माहिती सुधाकर यांनी दिली. हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थींनीची कसून तपासणी केली जाईल. परिक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाटी ही तपासणी केली जाईल. तसेच, NEET प्रवेश परीक्षेतही हिजाब परिधान करण्याची परवानगी आहे, असंही त्यांनी पुढे सांगितले. हिजाब परिधान करण्याच्या निर्णयाला हिंदुत्त्ववाद्यांकडून विरोध होत असल्याने सुधाकर म्हणाले की, “मला या लोकांचे तर्क समजत नाही. हा निवडक निषेध आहे. कोणी दुसऱ्याच्या हक्कांचे उल्लंघन करू शकत नाही. हा धर्मनिरपेक्ष देश आहे.”
हे ही वाचा:
गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली
बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!
बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!
इस्रायलचा वेस्ट बँकमधील मशिदीवर बॉम्बहल्ला
कर्नाटकामध्ये हिजाब आणि भगवा हा वाद चांगलाच पेटला होता. याचे पडसाद कर्नाटकसह संपूर्ण देशात उमटले होते. बजरंग दलानेही या वादात उडी घेत आक्रमक भूमिका घेतली होती.