धीरेंद्र कृष्ण शास्त्री मिरारोडमध्ये; काँग्रेस, अंनिस म्हणतात कार्यक्रम होऊ देणार नाही

१८ आणि १९ मार्च रोजी होत आहे आयोजन

धीरेंद्र कृष्ण शास्त्री मिरारोडमध्ये; काँग्रेस, अंनिस म्हणतात कार्यक्रम होऊ देणार नाही

सध्या देशभरात बागेश्वर धमाचे प्रमुख यांची चर्चा आहे. आपण दुसऱ्या व्यक्तीचे मन जाणून घेऊ शकतो आणि त्या व्यक्तीची सर्व माहिती सांगू शकतात. या त्यांच्या दाव्यामुळे दाव्यामुळे धीरेंद्र शास्त्री सध्या चर्चेत आहे. देशाचा विविध भागात त्यांचे प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता धीरेंद्र शास्त्री यांना मुंबईतून आमंत्रण मिळाले आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संगाचा कार्यक्रम मीरा रोड येथे होत आहे. हा कार्यक्रम १८ आणि १९ मार्च रोजी होत आहे. त्यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती खुद्द बागेश्वर धामच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

धीरेंद्र शास्त्री येण्याच्या आधीच त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होताना दिसत आहे. काँग्रेस, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य काही संस्थांनी धिरेंद्रशास्त्री यांच्या मुंबई प्रवेशाला विरोध केला आहे. मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री उर्फ ​​बागेश्वर बाबा यांची महाराष्ट्रात दुसरी भेट आहे. याआधी ते नागपुरातील एका कार्यक्रमातून प्रकाशझोतात आले होते. मुंबई दौऱ्याची माहिती बागेश्वर धाम यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना ट्विटरच्या माध्यमातून निमंत्रित करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. नाना पटोले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या मुंबईत १८-१९ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी विनंती केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तीला राज्यात स्थान नाही. मुंबईत बागेश्वर महाराजांचे कार्यक्रम झाले तर आम्ही त्यांना विरोध करू, असे पाटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही विरोध केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कार्यक्रमाच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी बागेश्वर बाबांचा दरबार महाराष्ट्रातील नागपूर येथे भरला होता. त्यावेळीही बागेश्वरबाबांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते.

Exit mobile version