31 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरधर्म संस्कृती१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याने करणार रामललाचा जलाभिषेक

१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याने करणार रामललाचा जलाभिषेक

Google News Follow

Related

अयोध्येत रामललाच्या भव्य जलाभिषेकाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रभू रामाचे मंदिर तयार होत आहे.२३ एप्रिल रोजी अयोध्येत १५५देशांच्या नद्यांच्या पाण्याने रामललाचा जलाभिषेक केला जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते मणिराम दास कॅन्टोन्मेंट सभागृहात ‘जल कलश’ ची पूजा करण्यात येणार आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपाराय म्हणाले दिल्लीतील रामभक्त विजय जॉली यांच्या नेतृत्वाखालील टीम १५५ देशांतील नद्यांचे पाणी आदित्यनाथ यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू असून जानेवारी २०२४ मध्ये मंदिराचे गर्भगृह सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.

दिल्ली स्टडी ग्रुप या एनजीओने २०२० मध्ये पाणी गोळा करण्यासाठी ही मोहीम सुरू केली. या संघटनेचे अध्यक्ष दिल्लीतील भाजपचे माजी आमदार विजय जॉली आहेत. जगभरातील नद्यांचे पाणी साचले आहे. श्री रामजन्मभूमी मंदिराचा जलाभिषेक करण्यापूर्वी विजय जॉली गुरुवारी अयोध्येत पोहोचले आहेत.

माजी आमदार विजय जॉली यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. दिवंगत अशोक सिंघलजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी जगभरच्या नद्या आणि समुद्रांचे पाणी भारतात गोळा करेन आणि त्या पाण्याने भगवान श्रीरामाचा जलाभिषेक करू अशी शपथ घेतली होती असे माजी आमदार विजय जॉली यांनी सांगितले.

जलकलशांवर असतील त्या देशांचे झेंडे
जगभरातील देशांमधून आणलेल्या जलकलशांवर त्या देशांचे झेंडे, त्यांची नावे आणि नद्यांची नावे असलेले स्टिकर्स असतील. या कार्यक्रमात अनेक देशांचे राजदूतही सहभागी होणार आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानातील नद्यांचे पाणी पाकिस्तानच्या हिंदूंनी आधी दुबईला पाठवले आणि नंतर दुबईहून ते दिल्लीला आणले. आता हे पाणी अयोध्येत आणले जाईल.

हे ही वाचा:

कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर

नायजेरियात बंदुकधाऱ्याने गोळीबार करून मारले ५० जणांना

भाजपा सरकार पुरस्कार देईल असे वाटले नव्हते, पण मोदीजी तुम्ही मला चुकीचे ठरवलेत!

काँग्रेस नेते ए.के. अँटनींचे चिरंजीव अनिल अँटनीनी धरला भाजपाचा हात

या देशातून येणार पाणी
पाकिस्तानशिवाय सुरीनाम, चीन, युक्रेन, रशिया, कझाकिस्तान, कॅनडा आणि तिबेटसह इतर अनेक देशांतील नद्यांचे पाणीही भगवान रामललाच्या जलाभिषेकासाठी आणले जाईल असेही चंपा राय यांनी सांगितले.

रशिया-युक्रेनच्या नद्यांचेही पाणी
माजी आमदार विजय जॉली म्हणाले, “पाकिस्तानातील रावी नदीसह जगभरातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी गोळा करण्यात आले आहे. युद्धादरम्यानच रशिया आणि युक्रेनच्या नद्यांचे पाणी देखील गोळा करण्यात आले. या पाण्याने श्री रामजन्मभूमी मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाला भव्य स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा