उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री योगी यांचे मुंबईत आगमन होताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राजभवनात भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगी आदित्यनाथ यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ बांधण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री योगींनी ही मागणी मंजूर केली. रामललाच्या दर्शनासाठी लवकरच अयोध्येत येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना सांगितले. त्यावर योगी यांनी त्यांना उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने अयोध्येत येण्याचे निमंत्रणही दिले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप खासदार रवी किशन उपस्थित होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रांतिगाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली.त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली.आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व उपस्थितांसोबत देवीची आरती केली.
हे ही वाचा:
जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!
सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार
रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. योगी आदित्यनाथ मायानगरीत उद्योगपती आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांची भेट घेत आहेत. यासोबतच ते त्यांना यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहेत. यादरम्यान ते अनेक सभा घेणार आहेत. सीएम योगी मुंबईत रोड शोही करणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री योगी यांच्या रोड शोवरून महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले आहे.