सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म

सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म

सध्या देशात सनातन धर्माबाबत वाद सुरू आहे. काही धर्माचे लोक हिंदू धर्माकडे बोट दाखवत आहेत. या धार्मिक विरोधकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे असल्याचे विधान एका कार्यक्रमात बोलतांना केले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी भीनमाळ येथील नीलकंठ महादेव मंदिराला भेट दिली. यानंतर राजस्थानमधील जालोर येथे एका धार्मिक सभेत बोलतांना ते म्हणाले की, सनातन धर्म हा राष्ट्रधर्म आहे, आपण सर्वजण आपापल्या वैयक्तिक हितसंबंधांच्या पलीकडे जात या राष्ट्रीय धर्मात सहभागी होऊ.आमच्या धार्मिक स्थळांची कोणत्याही काळात विटंबना झाली, तर त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आम्हाला मोहीम राबवावी लागेल, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

देश अमृतकाळातून जात आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने अयोध्येत ५०० वर्षांनंतर रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे आज तुम्हा सर्वांच्या सहकार्याने राम मंदिराचे भव्य बांधकाम होत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अतिशय प्राचीन मंदिराला भेट देण्याचे पुण्य मला मिळत आहे हे माझे भाग्य आहे. या धार्मिक कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले. ते म्हणाले की, १४०० वर्षांपूर्वीचे जुने मंदिर पाहणे खूप छान वाटते.

Exit mobile version