मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले अयोध्येचे निमंत्रण…

‘बाळासाहेबांचे स्वप्न साकार होत असल्याचे पाहणार!’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले अयोध्येचे निमंत्रण…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रितसर आमंत्रण मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी तसेच विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांना ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी ही आमंत्रण पत्रिका दिली. अयोध्येतील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी व उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे यासाठी हे आमंत्रण देण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनीही त्याचा विनम्रपणे स्वीकार केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही आमंत्रण पत्रिका मिळाल्यानंतर एक्सवर संदेश लिहिला की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार…अयोध्येला जाणार.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राममंदिरासाठी ११ कोटी

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित, विराटचे पुनरागमन

बांग्लादेशमध्ये पुन्हा शेख हसिना यांच्याकडे सत्ता

मालदीव मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत स्थानिक नेत्यांमध्येच रोष

त्यांनी पुढे म्हटले आहे की, अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून या सोहळ्याचे निमंत्रण मला देण्यात आले आहे.

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सध्या देशभरात, जगभरात चर्चा सुरू आहे. त्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रणे मिळाली आहेत. त्यावरून सध्या राजकारणही पेटलेले पाहायला मिळते आहे. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालेले नाही. त्यावरूनही केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र २२ जानेवारीला नाशिकमध्ये गोदावरी किनारी आरती करण्याचा आणि त्याच दिवशी नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार असल्याची घोषणा केली.

Exit mobile version