ठाण्यात बायबल ओपन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने २० ते २२ मार्च या कालावधीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. त्यावरून टीका होत असून अशा धर्मांतरणाला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी पाठींबा देऊ नये अशी मागणी केली जात आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींनी विठ्ठलमूर्ती स्वीकारण्यास केली टाळाटाळ; व्हीडिओ व्हायरल
मातोश्रीवर या, भाजपाचे तिकीट मिळवा
आठ वर्षांनी संपुष्टात आला मुंबई रणजी संघाचा दुष्काळ
ममता बॅनर्जी जखमी, डोक्याला गंभीर दुखापत
विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी या कार्यक्रमाचे बॅनर सोशल मीडियावर टाकत हा विरोध दर्शविला आहे.
या बॅनरवर ख्रिस्ती आध्यात्मिक सभा युगपुरुष की क्षमा का युग असे प्रसिद्ध करण्यात आले असून बायबल ओपन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल सीबीटी ख्राईस्ट चर्च मुंबई या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे म्हटले आहे. ठाणे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी याठिकाणी २० ते २२ मार्च या कालावधीत हा कार्यक्रम होत आहे. सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रम सुरू होईल असे बॅनरवर म्हटले आहे.
ढवळीकर यांनी म्हटले आहे की, अशा कार्यक्रमातून धर्मांतरणाला प्रोत्साहन दिले जाते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सहभागी होऊ नये. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तसेच ठाणे पोलिसांनी या पद्धतीच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये. उलट त्यावर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालावे आणि कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.