राजकीय सत्तेपेक्षा आध्यत्मिक शक्ती ही मोठी असते त्याचे हे स्वरूप आपण या ठिकाणी बघत आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. आबासाहेब धर्माधिकारी यांच्या पदमभूषण पुरस्कार सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजकीय अधिष्ठानाला अध्यात्मिक अधिष्ठानाची जोड आशीर्वाद आणि प्रेरणा लागते त्याचे जिवंत उदाहरण या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या जनसमुदयाकडे बघून मिळते असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवी मुंबईतील खारघर येथे लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री आपल्या भावना व्यक्त करतांना पुढे म्हणाले, मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून नाही तर आपल्या परिवारातील श्री सदस्य म्हणून इथे उभा आहे महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार आप्पासाहेब आणि आदरणीय गृहमंत्र्यांनी अर्पण केला आहे. भर उन्हामध्ये एकही माणूस उठत नाही ही आप्पासाहेबांची ताकदआहे त्यांचा आशीर्वाद आहे. श्री सदस्यांच्या बैठकीची शिस्त येथे बघायला मिळत आहे. माझी पत्नी आणि श्रीकांत देखील या श्री सदस्यांमध्ये बसलेला आहे. ही शिस्त आहे,. इथे लहान मोठे कोणीही नाही आपण सगळे आप्पासाहेबांचे श्रीसदस्य आहोत.
हा जनसागर आप्पा साहेबांच्या प्रेमापोटी परवा रात्रीपासून येथे येऊ लागला ही शक्ती आहे. आप्पासाहेबांची जादू आहे आणि ही जादू पहायचं भाग्य आम्हाला लाभले आहे. ही गर्दी सर्व विक्रम मोडणारी आहे . हा विक्रम फक्त आप्पासाहेबांचे श्री सदस्यच मोडू शकतात हे मी प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो. आपण सर्वत्र देव शोधत असतो पण मला या अथांग महासागरामध्ये आप्पासाहेबांच्या रूपाने देवच दिसत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, २००८ मध्ये नानासाहेबांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. ते आपल्याला सोडून गेल्यावर हा पुरस्कार याच मैदानामध्ये अप्पासाहेबांनी स्वीकारला होता आणि त्याच मैदानामध्ये २०२२ चा महाराष्ट्र भूषण आप्पासाहेबांना अमित भाईंच्या हस्ते आपण दिला हा देवी योगायोग आहे. हे सहसा पाहायला मिळत नाही याचे साक्षीदार आपण सर्व या ठिकाणी झालेलो आहोत. २०१७ मध्ये अमितभाईंनी प्रयत्न केला आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांच्या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली याबद्दल अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी मनापासून आभार मानले.
म्हणून मी आज तुमच्या समोर उभा
ज्यावेळेस माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यावेळी माझं कुटुंब उध्वस्त झालं होतं. त्यावेळेस मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांनी आधार दिला आणि आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केलं दिशा दाखवली आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज मुख्यमंत्री नाही तर एक श्री सदस्य म्हणून उभा आहे. त्यामध्ये आप्पासाहेबांचे मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेय. कुटुंब उध्वस्त होत असताना त्यांना वाचवण्याचं, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी योगदान
धर्माधिकारी घराणे गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना तिच्या देण्याचं काम करत आहे. अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी योगदान दिलेले आहे. भरकटलेल्या अनेक कुटुंबियांना कुटुंबाला दिशा देण्याचे काम आदरणीय आप्पासाहेबांनी नानासाहेबांनी केले आता सचिन दादा ते कार्य पुढे नेत आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा:
अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ४४ मालमत्तांना मुंबई अग्निशमन दलाने बजावल्या नोटीस
काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची…
पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला, २१ कोटींचे हेरॉईन जप्त
मुंबई पुणे जुन्या मार्गावर बस दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, गोरेगावचे झांज पथकही होते
आप्पासाहेबांच्या निरुपणात मन स्वच्छ करण्याची कला
आबासाहेबांच्या पुरस्कार सोहळ्याला जमलेलया जनसमुदायाला उद्देशून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात सात नाही तर आठ आश्चर्य आहे, आठव आश्चर्य म्हणजे श्रीसेवक आहेत. फडणवीस पुढे म्हणाले , माणसांची खरी श्रीमंती संस्कारातून दिसते, हीच श्रीमंती मला श्री परिवारात दिसते आप्पासाहेबांनी निरुपणातून आपल्या सर्वांना सकारात्मकता दिली. कपडे खराब झाले तर धुता येते, शरीरही आंघोळीने स्वच्छ करता येते. पण मन कसे स्वच्छ कसे करायचे? मन स्वच्छ कसे करायचे याची कला आप्पासाहेबांच्या निरुपणात आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे, त्यांचे आभार मानण्यासाठीच हा पुरस्कार दिला, अशा भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.