गुंटुर जिल्ह्यात ख्रिश्चन माफियांचे थैमान

गुंटुर जिल्ह्यात ख्रिश्चन माफियांचे थैमान

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सह प्रभारी सुनिल देवधर यांनी आंध्र प्रदेश राज्य सरकार ख्रिश्चन मिशनऱ्यांना हिंदूंच्या सांस्कृतिक स्थळांना नष्ट करण्याच्या कामात सहकार्य करत असल्याचा आरोप केला आहे.

गुंटुर जिल्ह्यातील एडलापाडू येथे ज्याठिकाणी आधी सीतेची पावले असलेल्या ठिकाणी एक मोठा क्रॉस बेकायदेशीररित्या उभारला गेला आहे.

हे ही पहा:

गुजरातमध्ये ग्रामीण भागातही भाजपाला घवघवीत यश

याबाबत सुनिल देवधर यांनी ट्वीट देखील केले आहे. ते म्हणतात “आंध्र प्रदेशात एडलापाडू येथे, ज्याठिकाणी कधीतरी सीतेची पावले होती त्याठिकाणी अजस्त्र क्रॉस उभा केला गेला आहे. नरसिंहाची कोरीव प्रतिमा मागे दिसत आहे. गुंटुर जिल्ह्यात ख्रिश्चन माफियांनी थैमान घातले आहे. भाजपाच्या आंध्र प्रदेश विभागाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आंदोलन केले, परंतु प्रशासनाची मूक संमती आहे.”

ऑर्गनायझरने दिलेल्या सविस्तर वृत्तानुसार गुंटुर जिल्ह्यातील एडलापाडू या ठिकाणी सीता पादुका येथे अनेक वर्षांपासून हिंदु आपले विवाह कार्य करत होते. हळूहळू त्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांनी येऊन ती टेकडी मेरीची असल्याचा दावा करायला सुरूवात केली.

गुंटुर जिल्ह्याचे अधिकारी स्वतः देखील ख्रिस्ती असल्याने त्यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सातत्याने याविरोधात उठवलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष केले असा आरोप देखील केला जात आहे. एव्हांजलिकल ख्रिश्चन धर्मीयांचा महामार्गाला लागून असलेल्या या स्थळाचे धार्मिक स्थळात परिवर्तन करण्याची योजना होती.

वाढते ख्रिश्चन धर्मांतरण आणि हिंदु देवळांवर सातत्याने केले जाणारे हल्ले यांमुळे लोकांमध्ये चिंतेची भावना पसरली आहे. जानेवारी २०२१ मध्येच रामतीर्थम् सीता लक्ष्मण कोदंडराम मंदिरातील रामाच्या मूर्तीचे पावित्र्य भंग करण्यात आल्याची घटना घडली होती. विझिआनगरम् जिल्ह्यातील हे मंदिर सुमारे १५०० वर्षं प्राचीन मंदिर होते. या घटनेचा संपूर्ण आंध्र प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी निषेध केला होता.

माजी केंद्रीय मंत्री पी अशोक गजपती राजू, ज्यांनी विझिआनगरम् आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तीन मंदिरांच्या विश्वस्त मंडळांच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले होते, त्यांच्या सांगण्यानुसार गेल्या १९ महिन्यात राज्यात १२८ मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत.

Exit mobile version