उर्फीचा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही!

चित्र वाघ आपल्या भूमिकेशी ठाम

उर्फीचा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही!

मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यावरून सुरु असलेला वाद अजूनही थांबलेला नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, माझी ही ठाम भूमिका आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ अशी ठाम भूमिका चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा मांडली आहे.

चित्र वाघ उर्फी जावेदवर निशाणा साधताना म्हणाल्या, ती इतकी निर्लज्ज बाई आहे समोर येवून सांगते माझा हा भाग दिसला तो भाग दिसला.. तरच त्याच्यावर कारवाई होणार… अशी कोणती बाई म्हणते. त्यानंतर माझ्यावर प्रेम करणाऱ्या मैत्रिणी म्हणतात ती त्या धर्माची आहे म्हणून चित्रा वाघ विरोध करत आहेत. कोणता धर्म सांगतो असं उघडं-नागडं फिरा? ज्या धर्माची उर्फी आहे, ते हिजाबवरुन भांडणं करत आहेत आणि इंथे धर्माचा विषयच नाही. याठिकाणी विषय विकृती आहे असेही चित्र वाघ म्हणाल्या.

हा समाजस्वास्थ्याचा विषय असताना मुंबई, महाराष्ट्रातील कोणत्या आईला हा नंगा नाच मान्य आहे. कोणत्या बाबांना , दादांना, ताईला मान्य आहे . प्रसिद्धीसाठी असे नगण्य कपडे घालून जर कोणी रस्त्यावर येत असेल तर त्याला विरोध करायचा तर जो विरोध करतो त्याच्यावरच कारवाई केली जाते याबद्दल वाघ यांनी संताप व्यक्त केला.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

तुमच्या कुटुंबातील लोकांना विचारा हा नंगानाच त्यांना चालणार आहे का? आम्ही का भांडत आहोत… आम्ही समाजासाठी भांडत आहोत. आज जर हा आवाज थांबला तर हा नंगानाच संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आणि आमची ही संस्कृती नाही, फॅशनच्या नावाखाली हे सगळं चालू देणार नाही. तुम्ही काय करायचं ते करा तुमचं प्रोफेशन आहे, त्या पद्धतीने पेहराव करा पण तुम्ही फक्त प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी चिंध्या लावून फिरताय भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी हे मान्य आहे तुम्हाला? ‘ असा असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

Exit mobile version