सरन्यायाधीश म्हणाले, ‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली’

पुण्यातील कार्यक्रमात वक्तव्य

सरन्यायाधीश म्हणाले, ‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली’

अयोध्येत प्रभू श्री रामांचे मंदिर उभारल्यानंतर आज लाखो भक्त दर्शन घेत आहेत. अयोध्येत प्रभू रामांचे मंदिर उभे राहावे अशी अनेक वर्षांपासूनची देशासियांची इच्छा होती, ती अखेर पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभू राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडला होता. याच दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले आहेत. पुण्यामधील एका कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे गाव असून त्यांनी गावाला भेट दिली आणि राम मंदिराच्या ऐतिहासिक निकालावर त्यांनी भाष्य केले. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड म्हणाले, मी भारताचा सरन्यायाधीश झालो, अनेकवेळा कोर्टात काम करताना असे होते की, याचा पर्याय काय आहे, हे सुचत नाही. माझ्याकडे अयोध्येचे काम आले होते, तीन महिने त्याच्यावर आम्ही विचार करत होतो.

शेकडो वर्षांपासूनच्या प्रश्नावर मार्ग सापडत नव्हता. त्यावेळी मी माझ्या दैनंदिन जीवनात पूजा करताना या प्रकरणावर मार्ग शोधून देण्याची देवांना प्रार्थना केली. देवावर विश्वास, आस्था असेल तर नक्की मार्ग मिळतो, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

हे ही वाचा : 

तिरुपती व्हीआयपी दर्शन फसवणूक : वायएसआर काँग्रेसच्या आमदारासह दोघांवर गुन्हा

वायनाडमध्ये नव्या हरिदास देणार प्रियांका गांधींना टक्कर!

हमासच्या सिनवारचा नवा व्हीडिओ, बायकोकडे दिसली २७ लाखांची बॅग!

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या प्रवृत्तीबद्दल उपराष्ट्रपतींकडून चिंता

 

Exit mobile version