30 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरधर्म संस्कृतीन्यूटन, गॅलिलिओपेक्षाही समकालिन शिवाजी महाराज, महाराणाप्रताप बुद्धिमान, तेजस्वी

न्यूटन, गॅलिलिओपेक्षाही समकालिन शिवाजी महाराज, महाराणाप्रताप बुद्धिमान, तेजस्वी

विवान कारुळकरच्या पॉडकास्टमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा

Google News Follow

Related

पाश्चिमात्य देशांनी सातत्याने भारतीय संस्कृती कशी मागास आणि अशिक्षित होती असे नरेटिव्ह किंवा खोटा प्रचार केलेला आहे. मात्र दोन्हींची तुलना जर तथ्य आणि पुराव्यांसह केली तर भारतीय संस्कृती, भारतीय विचारधारा ही अधिक प्राचीन आणि सुदृढ तेवढीच प्रगत असल्याचे दिसते.

विवान कारुळकर याच्या कालरेषा (टाइमलाइन) या विषयावरील पॉडकास्टमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. विवान कारुळकर हा प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर आणि कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचा सुपुत्र असून त्याने सनानत धर्म अ ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस हे पुस्तक तीन भाषांमध्ये लिहिले आहे. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी त्याने हे पुस्तक लिहिले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सनातन धर्माच्या प्राचीनतेविषयी, त्यातल्या अनेक अज्ञात गोष्टींविषयी त्याचे संशोधन सुरू आहे. त्या अनुषंगाने त्याने काही तुलनात्मक असे मुद्दे या पॉडकास्टमध्ये मांडले आहेत.

या मुलाखतीत विवानने म्हटले आहे की, पश्चिमेचे नरेटिव्ह आहे की, त्या काळात न्यूटन हाच अत्यंत बुद्धिमान होता. तेव्हा स्वाभाविकच भारतात बुद्धिमान लोक नव्हते, असे सांगण्याचा एक प्रयत्न असतो. पण न्यूटन होता त्याचवेळेस छत्रपती शिवाजी महाराजही होते. त्यामुळे फक्त न्यूटनच त्या काळातील तल्लख बुद्धीचा होता, हे म्हणणे उचित ठरत नाही. ज्यामुळे केवळ न्यूटन हा त्या काळातील हुशार, बुद्धिमान व्यक्ती होता असे जे सांगितले जाते त्याला उत्तर तेवढेच तल्लख, तेजस्वी शिवाजी महाराज आहेत. त्यासाठीच कालरेषा समजणे आवश्यक आहे. ज्यातून आपल्याला खोटे काय ते समजून येईल. विवानने दुसरे उदाहरण दिले की, गॅलिलिओ, महाराणाप्रताप हे एकाचवेळी जगात वावरत होते. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हे न्यूटन आणि गॅलिलिओ हे त्या काळात तेवढेच हुशार आणि बुद्धिवंत होते. त्यामुळे त्या काळात न्यूटन आणि गॅलिलिओ हेच सर्वाधिक हुशार होते हे म्हणणे पटणारे नाही. ते एक पाश्चिमात्य देशांनी पसरवलेले नरेटिव्ह आहे.

विवानने सांगितले की, पृथ्वीराज चौहान त्याचवेळी भारतात होते. तेव्हा दा विंची यांचीही चर्चा होत असे. तेव्हा दा विंची हे जगातील कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून ओळखले जात. अशी अनेक उदाहरणे दिली जातील. अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा होता तेव्हाच आर्य चाणक्यही होते. त्यांच्याबद्दल बोलले जात नाही.

विवान म्हणाला की, पाश्चिमात्य देशांनी हे शोधले असा दावा केला जातो की, पृथ्वी चपटी नसून गोल आहे, हे त्यांनी ५०० वर्षांपूर्वी शोधले. पण हे वेदात आधीपासूनच लिहिलेले आहे. याचा अर्थ आर्य चाणक्य यांनाही ही गोष्ट माहीत असणार. ऍरिस्टॉटल यांनाही वाटत होते की, पृथ्वी ही चपटी आहे गोल नाही. मग ही गोष्ट आपल्याकडे वेदात यापूर्वीच सिद्ध झालेली असताना ऍरिस्टॉटल हे ग्रेट कसे होतात.

विक्रम संवत ही आपली कालमापन पद्धती होती. विक्रमादित्याचे राज्य हे अलेक्झांडरपेक्षा तीनपटींनी मोठे होते. विक्रमादित्याचा मृत्यू झाला तेव्हा २८०० वर्षांपूर्वी झाला असेल तर आता २८०१ चालले आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा!

करण ठाकूर ठरला जिल्हास्तरीय ‘मावळी मंडळ श्री’चा मानकरी

राहुल गांधींचा पायगुण चांगला नाही, पंतप्रधान मोदी हे विश्व गौरव पुरुष

सुन लो ओवैसी…संभाजीनगरचे नाव औरंगाबाद करणारा अजून जन्माला यायचा आहे!

सुश्रुत जेवढे प्राचीन आहेत तेव्हाच ग्रीक संस्कृती विकसित होत होती. इतिहासात ग्रीक संस्कृतीला प्राचीन म्हटले जाते तेव्हा ती सगळ्यात प्राचीन आहे असा दावा केला जातो, पण तेव्हाच सुश्रुत अस्तित्वात होते मग ती प्राचीन कशी? १० हजार वर्षांपूर्वी महाकाय हत्ती नष्ट झाले होते. पण २६ हजार वर्षांपूर्वी शिवलिंग उपलब्ध झाले आहे तर दक्षिण आफ्रिकेत ३२ हजार वर्षांपूर्वीचे एक शिवलिंग सापडते. अशी अनेक उदाहरणे आहेत. जेव्हा इतिहासातून सांगितले जाते की, महाकाय अशा प्राण्यांना मारून तेव्हाचा मनुष्य स्वतःचा उदरनिर्वाह करत असे, पण तेव्हा शिवलिंगाची पूजा होत होती, अशी संस्कृती तेव्हा अस्तित्वात होती.

एकेठिकाणी उत्खननात हे आढळते की, एका महाकाय हत्तीच्या शेजारीच स्वस्तिक चिन्हही कोरले गेले आहे. याचा अर्थ स्वस्तिक चिन्हही तेवढेच प्राचीन आहे.

गोमोपोथोर हा महाकाय प्राणी ८ लाख वर्षांपूर्वी नष्ट झाला होता. पण त्या प्राण्याचा उल्लेख फक्त एका ग्रंथात आहे  ते म्हणजे रामायण. रावणाची जी लंका होती, तेव्हा हेच गोमोपोथोर्स नावाचे महाकाय हत्ती तिथे लंकेच्या संरक्षणाचे काम करत असत.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा