कांदिवली पूर्व विधानसभेत भारतीय जनता पक्ष आणि भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘छठ पूजा’ उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो भक्त या उत्सवात सहभागी झाले होते. संपूर्ण विधानसभेत सात ठिकाणी छठ पूजा पार पडली. या सर्व ठिकाणी आमदार अतुल भातखळकर यांनी भेट देऊन सर्व छठ व्रतस्थाना महापर्व छठ पूजेच्या शुभेछ्या दिल्या.
कांदिवली पूर्व विधानसभेत दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्ष आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने ठिकठिकाणी छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात हा उत्सव पार पडला. त्यापूर्वी विधानसभेत छठ पूजेच्या निमित्ताने गन्ना तसेच साडी आणि पूजेसाठी आवश्यक सर्व साहित्याचे वाटप आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा..
ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम नाही
‘रोहित शर्मा विलक्षण कर्णधार; त्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवायची होती’
मेट्रो बांधकाम साइटजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जाहीर
लोखंडवाला संकुल येथील महाराणाप्रताप उद्यान, हनुमाननगर येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मैदान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह मैदान, श्रीराम नगर येथील दळवी प्लॉट स्कूल मैदान,राजीव गांधी मैदान, प्रमोद नवलकर उद्यान, अजमेरा कंपाऊंड तसेच मालाड पूर्व मधील गोविंद नगर पालिका शाळेजवळ आयोजित छठ पूजेमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.