मशिदीत ११ वेळा ‘श्री राम जय राम, जय जय राम’ जप करा!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेत्याचे मुस्लिमांना आवाहन

मशिदीत ११ वेळा ‘श्री राम जय राम, जय जय राम’ जप करा!

२२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मशिदी, दर्गा आणि मदरशांमध्ये ‘श्री राम, जय राम, जय जय राम’ असा जप करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी रविवारी केले आहे.

‘भारतातील ९९ टक्के मुस्लिम समाज आणि अन्य गैर हिंदूंचे भारताशी नाते आहे. हे नाते यापुढील काळातही असेच दृढ राहील. कारण आपले पूर्वज एकच होते. त्यांनी आपला धर्म बदलला. आपला देश नाही,’ असे इंद्रेश कुमार यांनी एका कार्यक्रमात सांगितले. इस्लाम, ख्रिश्चन, शीख अशा कुठल्याही धर्माचे पालन करणाऱ्या लोकांनी शांती, सद्भावना आणि बंधुत्वासाठी आपल्या आपल्या धार्मिक स्थळावर प्रार्थना करून अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी स्वतःला जोडण्याचे आवाहन इंद्रेश कुमार यांनी केले. ‘राम मंदिर, राष्ट्र मंदिर : ए कॉमन हेरिटेज’ पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे (एमआरएम) मुख्य संरक्षक कुमार यांनी सांगितले की, आपले पूर्वज एकच होते. आपली ओळख दाखवणाऱ्या आकांक्षाही समान आहेत. आपल्या सर्वांचे या राष्ट्राशी नाते आहे. आमच्या परदेशी व्यक्तींशी काही देणेघेणे नाही.

हे ही वाचा:

नव्या वर्षात भारतीय क्रिकेट संघ राहणार ‘बिझी’

निमंत्रण फक्त रामभक्तांना, मुख्य मंदिर पुजाऱ्यांकडून उद्धव आणि राऊतांची खरडपट्टी!

भारतासोबतचे संबंध बिघडत असताना, मालदीवचे राष्ट्रपती चीनला भेट देण्याची शक्यता!

बिहारमध्ये एका रात्रीत तलाव चोरीला

‘एमआरएमने आवाहन केले आहे आणि मी देखील आज पुन्हा आवाहन करतो की, दर्गा, मकबरा, मदरसे आणि मशिदींमध्ये ११ वेळा ‘श्री राम जय राम जय जय राम’चा जयघोष करा. त्यानंतर तुमच्या तुमच्या उपासनापद्धतींचा अवलंब करा,’ असे आवाहन कुमार यांनी केले.

Exit mobile version