देशभर सुरु देवीचा जागर! चैत्र नवरात्राला प्रारंभ

देशभर सुरु देवीचा जागर! चैत्र नवरात्राला प्रारंभ

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस! पण त्यासोबतच आजपासूनच चैत्र नवरात्रीलाही सुरुवात झाली आहे. दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी अर्थात चैत्र महिन्याचा पहिला दिवस असते नववा दिवस या कालावधीत हे नवरात्र साजरे केले जाते. या काळात भाविक मोठ्या भक्तीभावाने देवीची उपासना केली जाते

चैत्र नवरात्रीला वसंत नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. या काळात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. देशभर मोठ्या उत्साहात देवीचा हा उत्सव साजरा केला जातो. या कालावधीत हजारो देवी भक्त उपवास देखील करतात. तर देशभरात अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरूपातही देवीचा हा उत्सव साजरा केला जातो. ज्यामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

हे ही वाचा:

मोदी म्हणाले आगामी वर्षात सर्व मनोकामना पूर्ण होवोत

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झाला ‘ऐतिहासिक’ करार

श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; आणीबाणी लागू

‘आम्हाला उद्घाटनाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरु करा’

या नऊ दिवसांमध्ये देवी शैलपुत्री, देवी ब्रह्मचारिणी, देवी चंद्रघंटा, देवी कुष्मांडा, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, देवी कालरात्री,, देवी महागौरी, आणि देवी सिद्धीदात्री या देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या या काळात मोठ्या भक्तीभावाने देवीची पूजा केल्याने त्याचे भाविकांना चांगलं फळ मिळतं अशी श्रद्धा आहे. या व्हाईटर नवरात्रीवच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व प्रसिद्ध देवी मंदिरांमध्ये आज भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली.

Exit mobile version