हिजाब वादात कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचा हात असल्याचे उघड

हिजाब वादात कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचा हात असल्याचे उघड

कर्नाटकातील हिजाब प्रकरणात कॅम्पस फ्रंट इंडिया या संघटनेचा हात असल्याचे आता समोर आले आहे. रिपब्लिक टीव्हीने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय पुरस्कृत या सीएफआयच्या प्रतिनिधीला विचारल्यावर त्याच्याकडून हे स्पष्ट झाले की, या सगळ्या हिजाब मोहिमेला त्यांचे समर्थन आहे एवढेच नव्हे तर तेच याचे नेतृत्व करत आहेत.

रिपब्लिक टीव्हीच्या प्रतिनिधीने सीएफआयच्या उडुपी जिल्ह्यातील प्रतिनिधी असील अक्रमला विचारणा केल्यावर त्याने सीएफआयचा यात सहभाग असल्याचे कबूल केले.

रिपब्लिकच्या प्रतिनिधीने त्याला विचारले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास तुम्हाला सांगण्यात आले आहे का? यावर असील म्हणतो की, आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू कारण तो निर्णय आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. जर तो आदेश आमच्या बाजूने नसेल तर आमच्याकडे अन्य पर्याय आहेत.

रिपब्लिकने त्याला असे विचारले की, आता तुम्ही न्यायालयाकडून जो अंतरिम आदेश येईल तो मान्य करून मुलींना वर्गात जाण्याआधी हिजाब काढण्यास सांगाल का? यावर तो असील म्हणाला की, आम्ही त्यांना सक्ती करू शकत नाही. त्यांना तो अधिकार आहे. जर त्यांना हिजाब घालायचा असेल तर ते घालू शकतात.

रिपब्लिकच्या प्रतिनिधीने त्याला विचारले की, तुम्ही या मोहिमेला पाठिंबा देत आहात का? यावर तो म्हणाला की, आम्ही त्यांच्या पाठीशी नाही तर आम्ही त्यांचे नेतृत्व करत आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची त्यांना सक्ती करू शकत नाही कारण हा वैयक्तिक हक्काचा विषय आहे.

हे ही वाचा:

मुस्लिम आणि मुस्लिमेतरांमध्ये अंतर निर्माण करणारा हिजाब!

इक्बाल कासकरला ईडीकडून होणार अटक

ठाकरे सरकार, आता चौकशीची हिम्मत दाखवाच…

‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक; सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाईल’

 

यासंदर्भात उडुपीचे आमदार रघुपती भट म्हणाले की, ज्या मुली हिजाबसाठी आंदोलन करत आहेत, त्यांना कुणीतरी भडकावले आहे. आमच्या कॉलेजचे काही नियम आहेत त्याप्रमाणे मुली पटांगणात हिजाब घालू शकतात पण वर्गात नाही. पण सीएफआयच्या हस्तक्षेपानंतर या मुली आम्ही हिजाब घालून वर्गात जाणार अशी मागणी करू लागल्या.

आता या प्रकरणाची कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. १० फेब्रुवारीला कर्नाटक उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत कॉलेजात किंवा शाळेत कोणतेही धार्मिक वस्त्र घालून जाता येणार नाही, असे नमूद केले होते.

Exit mobile version