आपल्याकडचे सण ,उत्सव हे निसर्गाची ओढ निर्माण करणारे असतात. यातूनच पर्यावरणाची जागरूकता वाढते. सणाच्या या उत्साहात आपले आयुष्य सुख, समृद्धी आणि आनंदाचे क्षण उधळावे आणि हे सर्व सण शांतता, सामाजिक सलोखा , आणि सुव्यवस्था यांचे भान राखून सण साजरे करावेत. तर, “होळीचा सण नैसर्गिक रंगांचा वापर करून आणि पर्यावरण पूरक पद्धतीने होळी खेळण्याचे” आवाहान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
#होळी आणि #धूलिवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा…
सामाजिक जबाबदारीचे भान राखत आपल्यामुळे इतरांना इजा तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेऊया…#Holi pic.twitter.com/pYVPUcWOHG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 6, 2023
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जनतेला शुभेच्छा देत म्हंटले आहे कि, होळीचा हा पारंपरिक सण आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातो, या सणामुळेच आपल्याला पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याची शिकवण दिली जाते. यावर्षी सुद्धा या सणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये जागरूकता वाढीस लागण्याचे उपक्रम व्हावे. धुलीवंदनाच्या सणाला आपण रंगांची उधळण करतो. हे रंग आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातात. या सगळ्या छान रंगांप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात परस्परांमध्ये आपुलकी आणि स्नेहाचे नाते निर्माण होऊ देत. या सणांच्या उत्सव आणि उत्साहातून सुख, समृद्धी आणि भरपूर आनंदी क्षणाची उधळण व्हावी हीच मनोकामना असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा:
औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा
तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा
बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जण अटकेत
दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव
दरम्यान, महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर होळी साजरी केल्यानंतर ठाण्यातील आपल्या किसन नगर मधील घरी सहकुटुंब होळी साजरी केली आहे. काल त्यांनी होळीची विधिवत पूजा करून होळी दहन सुद्धा केले. यावेळेस उपस्थित लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नातवाबरोबर खेळ मजामस्ती करतानासुद्धा दिसले.