23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृती'पर्यावरणपूरक' रंग वापरून होळी साजरी करा

‘पर्यावरणपूरक’ रंग वापरून होळी साजरी करा

मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

Google News Follow

Related

आपल्याकडचे सण ,उत्सव हे निसर्गाची ओढ निर्माण करणारे असतात. यातूनच पर्यावरणाची जागरूकता वाढते. सणाच्या या उत्साहात आपले आयुष्य सुख, समृद्धी आणि आनंदाचे क्षण उधळावे आणि हे सर्व सण शांतता, सामाजिक सलोखा , आणि सुव्यवस्था यांचे भान राखून सण साजरे करावेत. तर, “होळीचा सण नैसर्गिक रंगांचा वापर करून आणि पर्यावरण पूरक पद्धतीने होळी खेळण्याचे” आवाहान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी   आपल्या जनतेला शुभेच्छा देत म्हंटले आहे कि, होळीचा हा पारंपरिक सण आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातो, या सणामुळेच आपल्याला पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याची शिकवण दिली जाते. यावर्षी सुद्धा या सणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये जागरूकता वाढीस लागण्याचे उपक्रम व्हावे. धुलीवंदनाच्या  सणाला आपण रंगांची उधळण करतो. हे रंग आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातात. या सगळ्या  छान  रंगांप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात परस्परांमध्ये आपुलकी आणि स्नेहाचे  नाते निर्माण होऊ  देत. या सणांच्या उत्सव आणि उत्साहातून सुख, समृद्धी आणि भरपूर आनंदी क्षणाची उधळण व्हावी हीच मनोकामना असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला  शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा:

शूटिंग दरम्यान महानायक जखमी

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा

तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा

बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जण अटकेत

दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव

दरम्यान, महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर होळी साजरी केल्यानंतर ठाण्यातील आपल्या किसन  नगर मधील घरी सहकुटुंब होळी साजरी केली आहे. काल  त्यांनी होळीची विधिवत पूजा करून होळी दहन सुद्धा केले. यावेळेस उपस्थित लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नातवाबरोबर खेळ मजामस्ती करतानासुद्धा दिसले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा