ब्राह्मण सामर्थ्य संमेलनाचे आयोजन उद्या सोमवार २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून सात्यकी सावरकर यांचीही उपस्थिती असेल. ‘न्यूज डंका’ हा या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.
हे ही वाचा:
भगवा दहशतवाद’ शब्द वापरणे ही चूक होती
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या प्रवृत्तीबद्दल उपराष्ट्रपतींकडून चिंता
हैदराबाद पबमध्ये पोलिसांचा छापा
नागपुरातील स्फोटके आणि दारूगोळा उत्पादन युनिट सुसाट
सोमवारी २१ ऑक्टोबरला सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर, पिंपरी वायसीएम हॉस्पिटलजवळ, मेट्रो स्टेशनजवळ हा कार्यक्रम होणार आहे. ‘आपल्या शक्तीला जागरुक करा’ हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे. सकल ब्राह्मण समाजाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी यासंदर्भात सांगितले की, ब्राह्मण समाजाला सातत्याने लक्ष्य करण्यात आले, पण राष्ट्रहिताचा विचार केला तर ब्राह्मण समाजाने नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे.ती ब्राह्मण समाजाची परंपरा राहिली आहे. तेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाने आपली एकजूट दाखवून द्यायला हवी.
गेल्या काही वर्षांत ब्राह्मण समाजाला लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः राजकीय स्तरावर ब्राह्मण समाजाला अनेक पद्धतीने लक्ष्य केले गेले. इतिहासातील अनेक प्रसंगांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजावर असभ्य भाषेत टीका करण्यात आलेली आहे. त्यातून ब्राह्मण समाजात एकजूट व्हायला हवी आणि या समाजाचे देशकार्यातील, महाराष्ट्राच्या प्रगतीतील योगदान काय आहे, हे जनमानसासमोर स्पष्ट व्हायला हवे, ही भूमिका पुढे येऊ लागली आहे.