गोलंदाज वेंकटेश प्रसाद म्हणतो हनुमान चालिसा

गोलंदाज वेंकटेश प्रसाद म्हणतो हनुमान चालिसा

भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद उत्कृष्ट स्विंगसाठी आणि जिगरबाज खेळासाठी ओळखला जातो. त्याच्या या आतापर्यंतच्या वाटचालीत हनुमान चालिसा खूप महत्त्वाची ठरली आहे. आपल्या जीवनात हनुमान चालिसाचा खूप मोलाचा वाटा असल्याचे मत वेंकटेश प्रसाद व्यक्त करतो. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने वेंकटेश प्रसादने हा व्हीडिओ शेअर करत हनुमंतावरील आपल्या भक्तीचा  हनुमान चालिसाचं नियमित पठण केल्यामुळे मला एक वेगळी शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते, असे ट्विट वेंकटेश प्रसादने केले आहे. हनुमंताच्या आशीर्वादाने आपण सर्व अडथळ्यांवर मात करू, असा विश्वासही वेंकटेश प्रसादने व्यक्त केला आहे. यासंदर्भातील एक व्हीडिओदेखील त्याने आपल्या ट्विटसोबत जोडला आहे.

हेही वाचा:

सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे

गडकरींमुळे महाराष्ट्रातून विकासाचा ‘मार्ग’

संजय राऊत म्हणतात, पंतप्रधान मोदींची बदनामी सहन करणार नाही

भिलाईतून ऑक्सिजन, गडकरींची भलाई

जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुं लोक उजागर॥1॥

राम दूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा॥2॥

अशी सुरुवात करत आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात हनुमान चालिसाचं खूप महत्त्व आहे, असं वेंकटेश प्रसाद या व्हिडिओत नमूद करतो. सध्याच्या संकटकाळात हनुमान चालिसामधील काही श्लोक हे खूप उपयुक्त ठरतात, असे तो आवर्जून सांगतो.

Exit mobile version