प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीतील आता कारसेवक कोठारी बंधू यांच्या नावाने रस्ता बांधण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. कोठारी बंधू हे पहिल्या कारसेवेच्या वेळी पोलीस गोळीबारात हुतात्मा झाले होते.
भारतीय संस्कृतीच्या कणाकणात ज्यांचे अस्तित्व आहे अशा प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर अयोध्येत होऊ घातले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानावर भव्य राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. नुकतेच या मंदीर निर्माणासाठीचे निधी संकलन अभियान भारतभर मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण या मंदिर निर्माणाला एका मोठ्या संघर्षाचा इतिहास आहे. त्यात शरद कोठारी आणि रामकुमार कोठारी या दोन भावांचे योगदान अतिशय मोठे आहे. राम मंदिराच्या संघर्षात या दोन्ही भावांना हौतात्म्य आले.
हे ही वाचा:
फडणवीस-पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘इथे’ फडकला तिरंगा
नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही विनापरीक्षा पास करणार
नक्षलवाद्यांनी जवानाला बंदी बनवले
कोण आहेत कोठारी बंधू?
शरद आणि रामकुमार कोठारी हे दोघे तरुण ‘कोठारी बंधू’ म्हणून प्रसिद्ध आहेत. हे मुळचे कोलकाताचे रहिवासी. वीस वर्षीय शरद आणि तेवीस वर्षीय रामकुमार हे दोघेही बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते होते. ऑक्टोबर १९९० मध्ये जेव्हा पहिल्या कारसेवेसाठी देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येत दाखल झाले होते त्यात या दोघांचाही समावेश होता. यावेळी विवादित बाबरी ढाच्यावर भगवा ध्वज फडकावण्याचा पराक्रम कोठारी बंधूनी केला. पण मुलायम सिंह यांच्या निर्दयी सरकारने केलेल्या गोळीबारात त्या दोघांना वीरमरण आले.
गेल्या वर्षी जेव्हा अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला तेव्हा कोठारी बंधूंच्या कुटुंबियांना त्याचे आमंत्रण देण्यात आले होते. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकांच्या प्रचारामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या कोठारी बंधूंची आठवण आवर्जून काढतात. आता त्यांच्याच स्मरणात प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीत रस्ता बांधून योगी सरकार कोठारी बंधूंना आगळी वेगळी आदरांजली वाहत आहे.