बिहारचे शिक्षण मंत्री डॉ.चंद्रशेखर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मनुस्मृती आणि रामचरितमानस या पुस्तकांचे वर्णन समाजात द्वेष पसरवणारे पुस्तक असे विधान केले आहे. रामचरित मानस दलित-मागास आणि महिलांना समाजात शिक्षण घेण्यापासून रोखतो. त्यांना त्यांचे हक्क मिळण्यापासून प्रतिबंधित करते, अशी टीका राजदचे आमदार चंद्रशेखर यांनी केली आहे.
नालंदा मुक्त विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत समारंभात बोलताना चंद्रशेखर म्हणाले की, देशात जातीने समाज एकत्र आणण्याऐवजी तोडण्याचे काम केले आहे. मनुस्मृती, गोस्वामी तुलसीदासांनी रचलेले रामचरितमानस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत माधव सदाशिव गोळवलकर यांनी लिहिलेले बंच ऑफ थाट्स यांनी ८५ टक्के लोकांना शतकानुशतके मागे ठेवण्याचे काम केले आहे.विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, भारत द्वेषाने नव्हे तर प्रेमाने मजबूत आणि समृद्ध होईल. देशात सहा हजारांहून अधिक जाती आहेत. जातीच्या तितक्याच द्वेषाच्या भिंती आहेत. तो जोपर्यंत समाजात आहे तोपर्यंत भारत विश्वगुरू होऊ शकत नाही.
हे ही वाचा:
आरेनंतर आदित्य यांची रेसकोर्ससाठी हाळी?
महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!
…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी
म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार
ते म्हणाले की, एकेकाळी मनुस्मृतीने समाजात द्वेषाचे बीज पेरले. त्यानंतर रामचरितमानसने समाजात द्वेष निर्माण केला. आजच्या काळात गुरु गोळवलकरांचा विचार समाजात द्वेष पसरवत आहे. ते पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली कारण ते दलित आणि वंचितांचे हक्क हिरावून घेतात. रामचरितमानसात असे अनेक श्लोक आहेत, जे समाजात द्वेष निर्माण करतात.