दिवाळीच्या या आनंदाच्या आणि उत्साहाच्या सणाचा शेवटचा दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे जातो आणि बहिण त्याला ओवाळते. या दिवशी यम आपली बहिण यमी हिच्या घरी भोजनासाठी गेला म्हणून या सणाला यम द्वितीया असे देखील म्हणतात.
सूर्याची मुले यम आणि यमी हे दोघे भाऊ- बहिण होते. बहिणीला अनेक वेळा भेटायला घरी बोलावल्यावरही बहिण भावाला भेटायला गेली नाही म्हणून मग यमच बहिणीकडे तिला भेटायला पोहचला. तेव्हा बहिणीने भावाला ओवाळून त्याला स्वादिष्ट भोजन देऊन त्याची ओवाळणी केली. भावाला सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तेव्हा पासून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो, असे मानतात.
हे ही वाचा:
काबुलमध्ये आत्मघाती स्फोटात १९ मृत्युमुखी
भारतीयांना इस्रायलची मैत्री बहुमूल्य
जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य
धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!
आपल्या मनातील सूड भावना, द्वेष आदी नकारात्मक भाव दूर करून आपल्यामध्ये बंधुभाव जागृत व्हावा याकरिता हा भाऊबीजेचा सण असतो. बहिण आणि भावाच्या या पवित्र आणि खास नात्याला समर्पित असा हा दिवस असतो.
या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेटायला तिच्या घरी जातो. तिच्याकडून टीका- ओवाळणी करून घेतो. बहिणीला आशीर्वाद रुपी भेटवस्तूही देतो. बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.