४ एप्रिल रोजी भगवान महावीरांची जयंती. वर्धमान, महावीर, सन्मती, श्रमण अशा अनेक नावांनी ते ओळखले जातात. अत्यंत विद्वान तेवढेच पराक्रमी असे महावीर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या चरित्राचा घेतलेला आढावा.
कुंडग्राम वैशाली (बिहार) राज्याचे गणराज्य असलेल्या क्षत्रियकुंड येथे चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी इसापूर्व सुमारे ६०० वर्षांपूर्वी भगवान महावीरांचा जन्म झाला. महाराणी त्रिशाला ही भगवान महावीरांची आई आणि महाराज सिद्धार्थ त्यांचे वडील होते. भगवान महावीर हे वर्धमान, महावीर, सन्मती, श्रमण आणि इतर अनेक नावांनी ओळखले जातात.
२३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर १८८ वर्षांनी त्यांचा जन्म झाला. भगवान पार्श्वनाथ यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता .’ भगवान महावीरांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई त्रिशाला यांना १६ प्रकारची स्वप्ने पडली होती, अशी मान्यता आहे. त्या स्वप्नांना जोडून महाराज सिद्धार्थांना त्यात दडलेला संदेश समजला. ज्यानुसार जन्माला येणारा मुलगा ज्ञानप्राप्ती करणारा, सत्य आणि धर्माचा प्रचारक, जगतगुरु इत्यादी महान गुणांचा असेल. याची खात्री पटली .
भगवान महावीरांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. महावीर लहानपणापासूनच हुशार आणि धाडसी होते. एकदा एक मदमस्त हत्ती नगरात धुमाकूळ घालत असताना त्याला त्यांनी शांत केले होते. लहानपणी मित्रांसोबत झाडावर पारंब्यांवर खेळताना जवळून आलेल्या अजगराचा त्यांनी शांत आणि निर्भयपणे मुकाबला केला. त्यांच्या धाडसाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. म्हणून त्यांना वीर असे संबोधन शोभून दिसते. युद्धकलेत ते तरबेज होते. ते उत्कृष्ट घोडेस्वार होते. मल्ल विद्येत महारथी होते. उत्तम पोहणे त्यांना येत असे. संगीतात ते पारंगत होते. अनेक कलांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सर्वार्थाने सर्वगुणसंपन्न असे झाल्यावर त्याच्या पालकांनी सिद्धार्थ आणि प्रियकारिणी यांनी त्यांचा विवाह वसंतपूरचे महासमंत समरवीर यांची कन्या यशोदा यांच्याशी केला.
महावीर स्वामी हे अंतर्मुख व्यक्तिमत्व होते.त्यांना सुरुवातीपासून सांसारिक सुखांमध्ये फारसा रस नव्हता, परंतु त्यांनी आपल्या आईवडिलांच्या इच्छेनुसार लग्न केले . महावीर स्वामींची संन्यास घेण्याची इच्छा आई-वडील गमावल्यानंतर प्रकट झाली, त्यांनी आपल्या मोठ्या भावाला परवानगी मागितली तेव्हा त्यांनी आपल्या भावाला थोडा वेळ राहण्याची विनंती केली. आपल्या भावाच्या आज्ञेनुसार, महावीर स्वामीजींनी दोन वर्षांनी वयाच्या ३०व्या वर्षी संन्यास घेतला.
हे ही वाचा:
दहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार
प्रोजेक्ट टायगर साजरी करतोय पन्नाशी
भारतात आहेत १०० वर्षांपेक्षा जुनी २३४ मोठी धरणे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नवीन लेनमुळे प्रवासाचा वेळ २०-२५ मिनिटांनी कमी होणार
महावीर स्वामी वयाच्या तिसाव्या वर्षी परिपूर्ण नियंत्रणाने श्रमण झाले. महावीर स्वामीनी दीक्षा घेतल्यानंतर अत्यंत कठोर तपश्चर्या केली आणि अनेक कठीण उपसर्ग धीराने सहन केले. वैशाख शुक्ल दशमीच्या दिवशी साडे बारा वर्षांच्या कठोर तपश्चर्या आणि साधनेनंतर महावीर स्वामीजींना रिजुबालुका नदीच्या काठी शालवृक्षाखाली केवल ज्ञान-तत्त्वज्ञानाची प्राप्ती झाली.
महावीरच्या इतर नावांमध्ये वीर, अतिवीर आणि सन्मती यांचा समावेश होतो. महावीर स्वामींनी २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांच्या तत्त्वांना ‘जैन धर्म’ म्हणून ओळखला जाणारा एक विशाल धर्म बनण्यास मदत केली. ते अतिंम तीर्थंकर म्हणून ओळखले जातात. भगवान महावीरांचा भारतावर मोठा प्रभाव होता. त्यांच्या उपदेशाचा त्या वेळी जनमानसावर आणि राज्य कार्त्यांवर सुयोग्य परिणाम झाला आणि अनेक राज्यकर्त्यांनी जैन धर्माला त्यांचा राज्यधर्म बनवला. अनेक राजांनी जैनधर्म स्वीकारला.