गुजरातमधील शाळांमध्ये शिकवली जाणार भगवद्गीता

गुजरातमधील शाळांमध्ये शिकवली जाणार भगवद्गीता

गुजरात सरकारने शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२२- २३ पासून गुजरातमधील शाळांमध्ये हा बदल लागू केला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरांविषयी जोडणे तसेच त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागील उद्देश असल्याचे गुजरात सरकारकडून सांगण्यात आले आहे.

गुजरात सरकारने यासंदर्भातला निर्णय जाहीर केला असून गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती जितू वाघानी यांनी यावेळी दिली आहे.

भगवद्गीता काही भागांमध्ये सादर केली जाणार असून इयत्ता ६ वी ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये कथा आणि मजकुराच्या स्वरूपात सादर केला जाईल. तर इयत्ता ९ वी ते १२ वी साठी प्रथम भाषेच्या पाठ्यपुस्तकात कथा आणि मजकूर या स्वरूपात सादर केले जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

तीन कोटी द्या, मग मिळेल नवाब मालिकांना जामीन!

हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’

गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास

यासोबतच, शाळांमध्ये प्रार्थना, श्लोक पठन, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धांच्या माध्यमातून देखील भगवद् गीतेचं शिक्षण दिलं जाईल, असं गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Exit mobile version