एआयने केली कमाल आणि रामलल्ला करू लागले स्मितहास्य

रामलल्लाचे गोड भाव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एआयने केली कमाल आणि रामलल्ला करू लागले स्मितहास्य

अयोध्येतील भव्य राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे विधी पार पडले. शिवाय हजारोंच्या संख्येने राम भक्त अयोध्या नगरीत दाखल झाले होते. भुतोनभविष्यती असा हा दिमाखदार सोहळा पार पडला. जगभरातील कोट्यवधी श्रीरामभक्तांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना सर्वच स्तरांवर व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण देशभरात यानिमित्ताने उत्साह होता. या सोहळ्याचे आणि प्रभू श्रीरामांच्या बालरुपातील मूर्तीचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच मूर्तीचे बोलके डोळे हे लोकांसाठी विशेष आकर्षण बनले आहेत. रामलल्लाच्या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये एआय जनरेटेड व्हिडिओचाही समावेश आहे. हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये बाल रूपातील प्रभू श्रीराम चक्क गोड हसताना दिसत आहेत. सोबतच ते आपल्या दर्शनाला आलेल्या आनंदी भक्तांकडे पाहत आहेत, असं वाटतं आहे. रामलल्लाचे गोड भाव दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. हा व्हिडीओ कोणी बनवला याबद्दल माहिती नसून लोकांनी कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!

श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि शिवराज्याभिषेक… तोच उत्साह, तोच आनंद!

राम मंदिराच्या उदघाटनावेळी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक!

मोदींकडून कामगारांवर पुष्पवर्षाव!

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पार पडला. मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ८४ सेकंदांचा अत्यंत शुभ मुहूर्त होता. शुभ वेळ १२.२९ मिनिटे ८ सेकंद ते १२.३० मिनिटे ३२ सेकंद इतकी होती. अभिषेक झाल्यानंतर रामलल्लाच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येतील प्रभू रामलल्ला यांचे लोभस रूप समोर आले. त्यानंतर देशभरात ‘जय श्री राम’चा नारा देण्यात आला. जगभरात या सोहळ्याचा उत्साह दिसून आला.

Exit mobile version