‘घरी रहा, योगाभ्यास करा’…७ व्या योग दिनाची संकल्पना

‘घरी रहा, योगाभ्यास करा’…७ व्या योग दिनाची संकल्पना

७ व्या आंतरराष्ट्रीय योग्य दिनासाठी ‘घरी रहा, योगाभ्यास करा’ ही संकल्पना असणारा आहे. केंद्रीय आयुष्य मंत्रालयातर्फे यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. २१ जून ला साजऱ्या होणाऱ्या सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एका विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालयातर्फे करण्यात आले होते. या कर्टन रेझर कार्यक्रमानिमित्त अनेक नामवंत योग गुरु आणि योग अभ्यासकांसह सरकारचे दोन मंत्री या ऑनलाईन व्यासपीठावर एकत्र आले होते. याच कार्यक्रमात योगाला समर्पित अशा ‘नमस्ते योगा’ या ॲपचेही उद्‌घाटन करण्यात आले.

शुक्रवार, ११ जून रोजी आयुष मंत्रालयाने, मोरारजी देसाई राष्ट्रीय योगसंस्थेच्या सहकार्याने हा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि आयुष विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री किरेन रीजीजू हे दोघे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यंदाच्या योगदिनाची संकल्पना, “घरी रहा, योगाभ्यास करा’ अशी असल्याचे सांगत त्याचे महत्व दोन्ही नेत्यांनी विशद केले.

या कार्यक्रमाला जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक गुरु आणि योगगुरु, श्री श्री रविशंकर, सद्गुरू जग्गी वासुदेव, ब्रह्मकुमारी सिस्टर शिवानी आणि स्वामी चिदानंद सरस्वती हे उपस्थित होते. त्यांनीही योगाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली. यात दैनंदिन योगाभ्यासासोबतच, योगाचे सखोल आध्यात्मिक पैलू आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी योगाभ्यासाची मदत याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

हे ही वाचा:

एरिक्सन कोसळला, सामना स्थगित

संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यातला आहे

स्वित्झर्लंड विरुद्ध वेल्स आठवा सामनाही अनिर्णीत

ठाकरे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दूरदर्शनवर १२ जून ते २१ जून अशी १० दिवसांची एक विशेष मालिका चालवली जाणार आहे, अशी माहिती आयुष मंत्री किरेन रीजीजू यांनी दिली. या मालिकेचा मध्यवर्ती संदेश ‘घरी रहा, योगाभ्यास करा’ हा आहे. सध्याच्या कोविड काळाच्या संदर्भाने हा संदेश महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. आरोग्य सुविधा आणि व्यवस्थापन, तसेच, आजार प्रतिबंधनासाठी योगाचे महत्व आज सर्वांनाच जाणवले आहे, असे रीजीजू यावेळी म्हणाले.

तर याच कार्यक्रमात आयुष मंत्रालयातर्फे महत्वाच्या अशा ‘नमस्ते योगा’ या मोबाईल ऍप्लिकेशनचे उदघाटन करण्यात आले आहे. हे ऍपवर योग प्रशिक्षक, योगाचे अभ्यासक आणि योगा विषयात काम करणाऱ्या संस्था यांच्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ असणार आहे.

Exit mobile version