धर्मांतर कराल तर सावधान… शासकीय लाभ मिळणार नाहीत

विक्रमगडच्या खुडेद ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय

धर्मांतर कराल तर सावधान… शासकीय लाभ मिळणार नाहीत

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्याच्या खुडेद या गावाने एक अनोखा ठराव ग्रामसभेत करून महाराष्ट्रापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या गावातील कोणत्याही नागरिकाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्या नागरिकाला आदिवासी विकास योजनेचे लाभ आता मिळणार नाहीत, असा ठराव करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिक ख्रिश्चन धर्म स्वीकारत असल्याची बाब स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात आले

तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या विषयावर ग्रामसभेत चर्चा करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानुसार झालेल्या ग्रामसभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा मोडीत काढून ख्रिश्चन धर्म स्वीकारला जात आहे. ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, त्यांना आदिवासी समाज घटक मानले जाऊ नयेत, लग्न, मृत्यूच्या विधीमध्येही बदल केला जात आहे. बेकायदेशीरपणे इतर धर्माची शिबिरे घेतली जात आहेत. याची दखल ग्रामपंचायतीने घ्यावी अशी मागणी करण्यात आली. असे प्रकार करणाऱ्यांना नोटीस पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा..

काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना केले रुग्णालयात दाखल

लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार

चीनचे अध्यक्ष जिनपिंग जी-२० परिषदेला अनुपस्थित राहणार, मग कोण येणार?

सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

या मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला. खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील जे नागरिक ख्रिश्चन धर्म स्वकारतील त्यांना कोणत्याही प्रकारच्या आदिवासी विकास योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा ठराव करण्यात आला आहे. याबद्दल बोलताना सरपंच लहू लडगे म्हणाले, या ग्रामपंचायत हद्दीतील अनेकजण आदिवासी संस्कृती सोडून इतर धर्म स्वीकारत आहेत. आदिवासी संस्कृती, परंपरा पाळत नसल्यामुळे तेढ निर्माण होत असल्याचा अर्ज प्राप्त झाला होता. त्यानंतर ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या कोणासही आदिवासी विकास योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा ठराव करून तो पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version