21 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरधर्म संस्कृतीराम भक्ताची होणार संकल्पपूर्ती; राम मंदिरासाठी ३१ वर्षांपासून आहेत अनवाणी

राम भक्ताची होणार संकल्पपूर्ती; राम मंदिरासाठी ३१ वर्षांपासून आहेत अनवाणी

कोल्हापूरमधील कारसेवकाचा पण

Google News Follow

Related

अयोध्येत राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्राचे मंदिर उभे राहिले पाहिजे यासाठी न्यायालयीन लढाई सुरू होतीच पण, अनेक राम भक्तांचीही इच्छा होती. राम मंदिर लवकरात लवकर व्हावे यासाठी अनेक देशभरातील राम भक्तांनी आपापल्या परीने विविध संकल्प केले होते. अखेर करोडो हिंदूंचे स्वप्न सत्यात उतरत असताना या रामभक्तांनी केलेल्या संकल्पांची देखील चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रातही काही लोकांनी राम मंदिरासाठी काही प्रण घेतले होते. त्यापैकीच एक आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील कारसेवक निवास पाटील. निवास पाटील यांनी राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. यासाठी त्यांनी १९९२ साली एक पण केला होता. १९९२ पासून श्रीराम मंदिर उभं राहत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार त्यांनी केला होता. इतकी वर्षे हा पण त्यांनी जपला. अखेर राम मंदिर निर्माण झाले असून त्यांचा पणही आता लवकरच संपणार आहे.

६ डिसेंबर १९९२ ला आयोध्येत बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा निवास पाटील हे अत्यंत सक्रिय होते. त्या जागी भव्य राम मंदीर व्हावे, यासाठी अनेक कारसेवकांनी वेगवेगळे निर्धार केले होते. त्यात एक होते निवास पाटील. त्यांनी जोपर्यंत भव्य मंदिर होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी आयुष्य जगण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी ते केवळ १९ वर्षाचे होते. मात्र, अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रमात अनवाणी राहत असल्याने मित्र आणि कुटुंबीयांनी त्यांना चप्पल घालण्याची विनंती केली. मात्र, ते आपल्या निर्धारावर ठाम राहिले.

“इतर कारसेवकांच्या तुलनेत मी केलेला त्याग काहीचं नाही. त्यामुळे मंदिर होईपर्यंत चप्पल घालणारचं नाही,” असं त्यांनी सांगितल. आता २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. हा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे. कारसेवकांचे बलिदान सार्थक झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना राम भक्त निवास पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

थलसेना दिवसाच्या अमृतमहोत्सवानिमित्त रक्तदान, शस्त्रप्रदर्शनाला गणेश नाईक, समीर वानखेडेंची उपस्थिती

जम्मू-काश्मीर: राजौरीमध्ये भूसुरुंग स्फोटात एक जवान हुतात्मा, दोन जवान जखमी!

मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याचे पैसे संजय राऊतांच्या बंधू, लेकीच्या खात्यात

अदानीविरोध करणारी काँग्रेस तेलंगणातील करारानंतर गप्प

निवास पाटील यांच्या या अनोख्या भक्तीसाठी आणि त्यागी वृत्तीबद्दल २२ जानेवारी रोजी त्यांचा संकल्पपूर्तीनिमित्त त्यांच्या गावात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिये गावात निवास पाटील हे राहतात. १९९२ च्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला तेव्हापासून गावात निवास पाटील यांना रामभक्त म्हणून ओळखलं जातं. निवास पाटील हे शालेय मुलांना रिक्षातून शाळेत सोडण्याचं काम करतात. याबरोबरचं गावात अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा