ठाण्यात बांधणार बागेश्वर धामचे मोठे मंदिर

ठाण्यातील बाबा बागेश्वर मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू आहे. या भूमिपूजन प्रसंगी आचार्य धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थक उपस्थित राहणार आहेत.

ठाण्यात बांधणार बागेश्वर धामचे मोठे मंदिर

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सध्या मुंबईत आहेत. त्यांच्या दरबारामध्ये लाखो लोक हजेरी लावत आहेत. आता ठाण्यामध्येच बागेश्वर धामचे मोठे मंदिर बांधण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाण्यातील बाबा बागेश्वर मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू आहे. या भूमिपूजन प्रसंगी आचार्य धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थक उपस्थित राहणार आहेत. सोमवारी मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राची मागणी लावून धरली आहे. काल मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांनी भारत निश्चितपणे हिंदू राष्ट्र होईल, असा दावा केला होता. दुसरीकडे महाविकास आघाडी सातत्याने धीरेंद्र शास्त्रींना विरोध करत आहे.पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. आता आज समर्थकांसह ते ठाण्यातील मंदिराच्या कामाचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे.

मुंबई लगतच्या मीरा रोड परिसरात बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरवण्यात आला होता. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे लाखो अनुयायायानी त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती. १८ आणि १९ मार्च असा दोन दिवस दरबार सुरु होता. बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचा दोन दिवसांचा दरबार आता संपला आहे.

हे ही वाचा:

लंडनमध्ये भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्याने खलिस्तानी समर्थकांना शिकवला धडा

प्रकाश सुर्वे यांचा बॅनर काढल्यावरून भाजपा कार्यकर्त्याला मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

अमृता फडणवीसांना धमकावणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या

‘सावरकर समझा क्या, नाम राहुल गांधी है’ यावरून राहुल गांधी निशाण्यावर

या कार्यक्रमादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. मुंबईचे नाव माधव नगरी व्हायला हवे, असे ते म्हणाले. धीरेंद्र शास्त्री यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना धीरेंद्र शास्त्री यांनी मी आव्हानाला घाबरत नसल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version