बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले

भाविकांची दर्शनासाठी झुंबड

बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले

रविवारी बद्रीनाथ धामाची द्वारे खुली झाली. भाविकांना आता पुढचे सहा महिने बद्रीनाथाचे दर्शन आणि पूजा करता येणार आहे. हजारो भाविक या पवित्र क्षणाचे साक्षीदार होते. बद्रीनाथ धामाचे दरवाजे उघडताच भाविकांची झुंबड उडाली. मुख्यमंत्री धामी यांनी दरवाजे उघडताच भाविकांना शुभेच्छा दिल्या. हलक्या पावसाच्या साक्षीने लष्कराचा बँड व ढोल-नगाऱ्यांच्या दणदणाटात स्थानिक महिलांनी पारंपरिक संगीत आणि नृत्याच्या साथीने हा सोहळा झाला.

धार्मिक परंपरेसह कुबेर, उद्धव आणि गाडू घडा यांना दक्षिण द्वारातून मंदिर परिसरात आणले गेले. त्यानंतर मंदिराचे मुख्य पुजारी रावल सह धर्माधिकारी, हक हकूकधारी व बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांच्या उपस्थितीत साग्रसंगीत मंदिराचे दरवाजे उघडले. मुख्य पुजारी वीसी ईश्वर प्रसाद नंबूदरी यांनी गर्भगृहात विशेष पूजा केली. त्यानंतर बद्रीनाथाचे दर्शन खुले करण्यात आले.

उत्तराखंडची चारधाम यात्रा उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री धामपासून सुरू होते. जी गंगोत्री आणि केदारनाथजवळून जात बद्रीनाथ धाम येथे पोहोचते. यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे १० मे रोजी खुले झाले आहेत. दरवाजे उघडले तेव्हा श्रीबदरीनाथ पुष्प सेवा समितीच्या सहकार्याने आस्था पथपासून धामपर्यंत ऑर्किड आणि झेंडूच्या १५ क्विंटल फुलांची सजावट करण्यात आली होती.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरे हा निलाजरा माणूस’

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी चौथ्या भारतीयाला अटक!

महाराष्ट्रात कोण भारी?

‘निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्हाला लोकानुनयाची गरज नाही’!

आदिकेदारेश्वरचे दरवाजेही उघडले

बद्रीनाथ धामाचे दरवाजे उघडण्याआधी आदिकेदारेश्वर मंदिराचे दरवाजेही उघडतात. परंपरेनुसार परंपरेनुसार, सकाळी पाच वाजता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार, पाच वाजून २० मिनिटांनी वैदिक मंत्र उच्चारण सुरू झाले. त्यानंतर दरवाजावर लावलेले सील उघडण्यात आले आणि हे दार उघडले.

गेल्या वर्षी विक्रमी भाविक

सन २०१६मध्ये सहा लाख ५४ हजार ३५५, सन २०१७मध्ये दोन लाख चार हजार ६६, सन २०१८मध्ये १० लाख ४८ जार ५१, सन २०१९मध्ये १२ लाख ४४ हजार ९९३, सन २०२०मध्ये १५ लाख पाच हजार ५५ भाविक बद्रीनाथ येथे आले होते. तर, सन २०२१मध्ये करोना संकटामुळे केवळ एक लाख ९७ हजार ८८७ भाविकांनीच बद्रिनाथाला भेट दिली. करोना साथीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सन २०२२मध्ये १७ लाख ६३ हजार ५४९ भाविक, सन २०२३मध्ये १८ लाख ३९ हजार ५९१ भाविकांनी बद्रिनाथाचे दर्शन घेतले होते.

Exit mobile version