रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अय्यूब खान यांनी स्वीकारला हिंदू धर्म

विहिंपच्या नेत्यांनी पाय धुवून केली घरवापसी

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अय्यूब खान यांनी स्वीकारला हिंदू धर्म

मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथील एका मुस्लिम कुटुंबाने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात हिंदू धर्माचा स्वीकार केला. शहरातील अय्यूब उर्फ पीरूभाई यांनी पत्नी आणि दोन मुलांसह हिंदू धर्माचा स्वीकार केला. त्यांनी सांगितले की, त्यांचे पूर्वज हिंदू होते आणि ते आता घरवापसी करत आहेत, कारण त्यांना हिंदू धर्म आणि त्यांची पूजापद्धती पसंत आहे.

२२ जानेवारी या ऐतिहासिक तारखेला समारंभपूर्वक अय्यूब यांच्या कुटुंबीयांचे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाय धुवून आणि अंगवस्त्र परिधान करून हिंदू धर्मात स्वागत केले. अय्यूब आता राजकुमार आणि त्यांच्या पत्नीचे नाव करिश्मा असेल.
‘अय्यूब यांनी आदिवासी तरुणी करिश्माशी निकाह केला होता. पत्नीसोबत राहून मुस्लिम असणाऱ्या अय्यूब यांनी हिंदू धर्म आणि पूजापद्धतीला पाहिले आणि समजून घेतले.

हे ही वाचा:

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!

पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत

मुस्लिमांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह हिंदूंच्या ताब्यात द्यावी!

त्यामुळे प्रभावित होऊन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि विधीपूर्वक हिंदू धर्म स्वीकारला,’ असे विहिंपचे नेते संजय मांझी यांनी सांगितले. विहिंपचे कार्यकर्ते अय्यूब यांच्या घरवापसीमुळे खूप खूष झाले आहेत.

Exit mobile version