दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम
तमाम भारतीयांना आणि जगभरातील राम भक्तांना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती तो दिवस उजाडला आहे. सोमवार, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण आणि राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. देश- विदेशातील मान्यवर अयोध्येमध्ये आले आहेत. राम लल्लांचे स्वागत करण्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे.
भव्य दिव्य सोहळा होणार असून दुपारी १२ वाजून १५ मिनिट ते १२ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान राममूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मंदिरात पूजाविधीला सुरुवात झाली आहे. शहरात जवळपास १५ हजार पोलीस आणि सुरक्षाबल तैनात करण्यात आले आहेत. राम नगरी अतिशय सुंदर अशी सजवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
२०१० पासून बेपत्ता असलेला नक्षलवादी संतोष शेलार आत्मसमर्पणाच्या तयारीत
१५ वर्षांच्या जमिनीवरून वादाचे पर्यवसान गँगवॉरमध्ये, नोएडात एकाची हत्या!
भारतीय विमान वापरण्यास मुईझ्झुनी परवानगी नाकारली; मालदीवच्या मुलाचा मृत्यू
राम मंदिरासाठी भेट म्हणून भाविकाने दिले १०१ किलो सोने!
निमंत्रितांच्या आगमनाला सुरुवात झाली असून त्यांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. कार्यक्रमासाठी VIP व्यक्ती मंदिराकडे निघाल्या आहेत. वीणा चौकातील मुख्य रस्त्यावरून लोक मंदिराकडे जात आहेत. संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू रामांची प्रतिमा असणारे भगवे झेंडे गाड्यांवर, घरांवर दिसत असून संपूर्ण देश राममय झाला आहे. घरोघरी उत्सहाचे वातावरण असून दिपोत्सव साजरा केला जात आहे. राम लल्लाच्या आरतीवेळी घंटानाद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय संपूर्ण अयोध्येत हेलीकॉप्टरने पुष्पवर्षावदेखील करण्यात येणार आहे.