गेल्या काही दिवसांपासून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे चर्चेत आहेत. आता स्वामी श्री गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी या शंकराचार्यांवर घणाघाती टीका केल्याने पुन्हा एकदा अविमुक्तेश्वरानंदांची चर्चा रंगली आहे. अविमुक्तेश्वरानंद हे फेक बाबा आहेत, असा घणाघातच त्यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, नुकतेच हे अविमुक्तेश्वरानंद अंबानी यांच्या घरी लग्नासाठी गेले होते. त्यांना शंकराचार्य ही उपाधी देण्यात आली आहे. पण मी सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की, मुक्तेश्वरानंद ही व्यक्ती बनावट आहे. त्यांच्या नावापुढे साधू, संत, संन्यासी अशी कोणतीही उपाधी लावता येणार नाही, शंकराचार्य तर खूप दूरच राहिले.
गोविंदानंद यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घणाघाती आरोप केला आहे. त्यांनी वाराणसी न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवत म्हटले की, अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले होते. त्यांना फरारी घोषित करण्यात आले आहे. हे आम्ही सर्वोच्च न्यायालयातही सादर केले आहे पण तिथे तारखा पडत आहेत. आम्हाला न्याय हवाय. ही व्यक्ती देशासाठी घातक आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशातील ५६ टक्के आरक्षण रद्द, ९३ टक्के जागा गुणवत्तेवर भरणार !
इस्रायलचा येमेनवर बॉम्ब हल्ला, तिघांचा मृत्यू, ८० जखमी !
एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील…
फ्लाईटमध्ये विनयभंग; जिंदाल स्टीलच्या सीईओला गमवावी लागली नोकरी !
गोविंदानंद म्हणाले की, काँग्रेसकडून या अविमुक्तेश्वरानंद यांना पाठिंबा दिला जात आहे. प्रियांका वड्रा यांनी १३ सप्टेंबर २०२२ला पत्र लिहिताना त्यात य़ा अविमुक्तेश्वरानंद यांचा उल्लेख शंकराचार्य असा केला. त्या त्यांना शंकराचार्य कसे काय म्हणू शकतात? सर्वोच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिलेली आहे. काँग्रेस ठरवणार का, शंकराचार्य कोण ते? हे अविमुक्तेश्वरानंद नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे आहेत, मग त्यांना पाठिंबा कुणाचा आहे. प्रियांका वड्रा यांचा का? राहुल गांधी यांनी हिंदूविरोधी वक्तव्य केल्यानंतरही अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांचे समर्थन केले. का केले? कारण हे पत्र त्याला कारणीभूत आहे. काँग्रेस हा खेळ खेळत आहे. अविमुक्तेश्वरानंद हे केवळ एक खेळणे आहे. मी प्रियांका वड्रा यांना आवाहन करतो की त्यांनी पत्र लिहिल्याबद्दल जाहीररित्या माफी मागावी नाहीतर आण्ही सर्वोच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू.
उत्तराखंडमधील ज्योर्तिमठाचे शंकराचार्य म्हणून जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २०२२मध्ये स्थगिती आणली होती. अधिवक्ते तुषार मेहता यांनी माहिती दिली होती की, ज्योतिष पीठाचे शंकराचार्य म्हणून अविमुक्तेश्वरानंद यांच्या नियुक्तीविरोधात पुरीच्या गोवर्धन मठाच्या शंकराचार्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
स्वामी स्वरूपानंद यांच्यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांची शंकराचार्य म्हणून नियुक्ती झाली होती पण ती वादग्रस्त ठरली होती.
अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधी यांच्या संसदेतील हिंदूचा अपमान करणाऱ्या विधानाचे समर्थन केले होते. तसेच उद्धव ठाकरे यांना समर्थन देत त्यांचा विश्वासघात झाल्याचे म्हटले होते. जोपर्यंत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केले जात नाही, तोपर्यंत दुःख कमी होणार नाही, असे ते म्हणाले होते.