…आणि रायगडावरील ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

…आणि रायगडावरील ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे करण्यात आलेले आक्षेपार्ह बांधकाम अखेर हटवण्यात आले आहे. राज्यसभा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजी छत्रपती यांच्या पाठपुराव्यानंतर पुरातत्व खात्याने ही कारवाई केली आहे. युवराज छत्रपती यांनी ट्विट करत या संबंधीची माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?
रायगड येथील मदार मोर्चा या भागात काही अज्ञातांनी अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला आहे. या भागात रंगरंगोटी करून चादर टाकून प्रार्थनास्थळ तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. महाराष्ट्रातील शिवप्रेमी नागरिकांनी या संपूर्ण घटनेला वाचा फोडताना याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. समाज माध्यमांवरुनही या विरोधात बोलले आणि लिहिले जात होते.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये मोदींचा ताफा अडवल्याचे महाराष्ट्रात पडसाद

मोदी अडथळा बनलेत…

सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल फिरोजपूर एसएसपी निलंबित

ताफा अडविल्याप्रकरणी पंतप्रधानांना काय म्हणाले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती?

युवराज संभाजी छत्रपती यांच्याकडेही या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी पुरातत्व खात्याला पत्र पाठवून या विषयात कारवाई करण्यास सांगितले होते. रायगडाचे पावित्र्य आणि महत्व अबाधित राहावे यासाठी तिथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम अथवा रचना करण्यास पायबंद असावा असे युवराज संभाजी छत्रपती यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

त्यानुसार पुरातत्व खात्याने या प्रकरणाची दाखल घेतली असून त्या संबंधी कारवाई केली आहे. युवराज संभाजी छत्रपती यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली असून त्याचे फोटोही पोस्ट केले आहेत.

Exit mobile version