ऑस्ट्रेलियाने परत केल्या भारताच्या २९ पुरातन वस्तू

ऑस्ट्रेलियाने परत केल्या भारताच्या २९ पुरातन वस्तू

ऑस्ट्रेलियाने तब्बल २९ पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत. यात भगवान शिव, भगवान विष्णू आणि जैन परंपरेशी संबंधित अशा मूर्ती आहेत. या सर्व मूर्तींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या वस्तू अतिशय प्राचीन असून भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिक आहेत. यामध्ये अनेक देवी- देवतांच्या मूर्ती, प्राचीन सजावटीचे सामान यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

या पुरातन वस्तू भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य, शक्तीची उपासना, भगवान विष्णू आणि त्यांची रूपे, जैन परंपरा, चित्रे आणि शोभेच्या वस्तू या सहा श्रेणीतील आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाळूचा खडक, संगमरवरी, कांस्य, पितळ अशा विविध प्रकारच्या साहित्यापासून बनवलेली शिल्पे आणि कागदावर काढलेली चित्रे असल्याची माहिती आहे.

या पुरातन वस्तू प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा येथील परंपरेचे प्रतिक असल्याची माहिती आहे. या वस्तू नवव्या आणि दहाव्या शतकातील वेगवेगळय़ा काळांतील आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात अनेक प्राचीन वस्तू भारतात परत आणल्या गेल्याचा दाव करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘जनाब सेना’वरून शिवसेनेची आगपाखड; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका

बुलडोझरच्या भीतीने आरोपीने केलं आत्मसमर्पण

कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी

‘त्या’ धावणाऱ्या मुलावर झाले आनंद महिंद्र फिदा

यापूर्वीही नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले होते की, यापूर्वी अनेक मूर्ती चोरीला गेल्या आणि त्या भारताबाहेर गेल्या. कधी या देशात, कधी त्या देशात या मूर्ती विकल्या गेल्या. या मूर्ती परत आणणे ही आपली जबाबदारी आहे.

Exit mobile version