जिहादींचा नंगानाच; कानिफनाथ मंदिरातील पुजारी, भक्तांना लाथाबुक्क्यांनी मारले

अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील घटना, गावात प्रचंड संताप

जिहादींचा नंगानाच; कानिफनाथ मंदिरातील पुजारी, भक्तांना लाथाबुक्क्यांनी मारले

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील अहिल्याबाई होळकर नगरातल्या गुहा गावात चार दिवसांपूर्वी जिहादी मानसिकतेचा नंगानाच पाहायला मिळाला. तिथे असलेल्या कानिफनाथांच्या मंदिरातील पुजाऱ्यांना ९ नोव्हेंबरला याच जिहादी मानसिकता असलेल्या काही लोकांनी मारहाण केली. तेथील कट्टर मुस्लिमांकडून या पुजाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. लाथा बुक्के मारून या पुजाऱ्यांना तसेच तिथे आलेल्या भक्तांना जखमी करण्यात आले. याचा व्हीडिओ आता सोशल माध्यमात तुफान व्हायरल होत आहे.

 

राहुरी तालुक्याअंतर्गत हे गुहा गाव येते. तिथे नाथसंप्रदायातील गुरू कानिफनाथांचे मंदिर आहे. त्यांची संजीवन समाधी आहे. पण ही जागा दर्ग्याची असल्याचा काही मुस्लिमांचा दावा आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयातही आहे. सदर जमीनही मंदिराच्या अखत्यारित असल्याचा दावा केला जात असला तरी ती वक्फ बोर्डाची असल्याचा दावाही केला जात असल्याचे स्थानिक सांगतात. इथे पूजा आरती करण्याची मागणी हिंदूंनाच करावी लागते, याबद्दल स्थानिक हिंदूंमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसेच तहसिलदारांना वारंवार निवेदनेही दिली जातात.

 

याचदरम्यान तहसिलदारांनी हिंदूंना येथे पूजा करण्याची परवानगी दिली. ती मिळाल्यानंतर हिंदूंनी तिथे साफसफाई करून पूजेची तयारी केली. तेव्हा गुरुवारी ९ नोव्हेंबरला काही मुस्लिमांनी हिंदू पुजाऱ्यांवर हल्ला केला. एवढेच नव्हे तर पूजा करणाऱ्या भक्तांनाही लाथाबुक्क्यांनी मारले. पण अद्याप यासंदर्भात कोणतीही पोलिसी कारवाई झालेली नाही. एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, लवकरच आरोपींना पकडले जाईल.

 

स्थानिकांनी यासंदर्भात एका वाहिनीला माहिती दिली की, इथे दर अमावस्येला पूजा अर्चा होते. आरती होते. महाप्रसाद होतो. वर्षानुवर्षे हे होत असते. मात्र ९ तारखेला सकाळी पुजारी, भजनी मंडळी तिथे गेल्यावर त्यांचे सगळे साहित्य फेकून देण्यात आले. स्थानिक सांगतात की, वाद होण्याचे कारण एकच की हे आमचे ग्रामदैवत आहे. गुहाला नाव कानिफनाथांमुळे पडलेले आहे. पण वक्फ बोर्डाकडून रमझान शहा दर्गा यांचे हे ठिकाण आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली. तो दर्गा नाही तर ते आमचे ग्रामदैवत आहे. ते समाधी मंदिर आहे, महादेवाची पिंडी आहे. पण तो समाधी मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आला. माती टाकून बुजविण्यात आला.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या

दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी ९९९ वर

फटाका अंगावर फेकल्याने तरुणाचा मृत्यू!

आरक्षणासाठी मराठा तरुणाची आत्महत्या

एकाने सांगितले की, मंदिराची ही ३२ एकर जागा आहे. पण ती जागा कब्जा करण्यात आली आहे. त्यांची घरेही अनधिकृत आहे. दिवा बत्ती करण्यासाठी हे मंदिर दिले होते. पण ती जमीनही हडप करण्यात आली आणि हे पुरातन काळापासून आमचेच असल्याचा दावा करण्यात आला.

 

स्थानिक सांगतात की, हा वाद मिटला पाहिजे. कारण इथे कानिफनाथ यात्राही अनेक वर्षांपासून भरते. पण दोन वर्षांपासून हे सगळे आपलेच असल्याचा दावा केला जाऊ लागला. रमझान शहा बाबा असे नाव सांगून त्यांचा दर्गा असल्याचा दावा मुस्लिम करतात. आम्हाला हा कोण बाबा हे माहीतही नाही. ही देवस्थानाची जागा रिकामी करावी आणि मंदिराची जागा त्यांना दिली तर हा वाद मिटेल असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version