‘नो बिंदी नो बिझनेस’ #NobindiNoBusiness या हॅशटॅगने चाललेली चळवळ चांगलीच प्रभावी ठरली आहे. लेखिका शेफाली वैद्य यांनी या हॅशटॅगने ही चळवळ सुरू केली. त्यामुळे आता तनिष्क या कंपनीलाही आपली एक जाहिरात बदलावी लागली.
तनिष्कच्या दागिन्यांच्या जाहिरातीत एक महिला दिवा लावताना दाखवली आहे आणि या दागिन्यांवर किती सवलत आहे वगैरे लिहिले आहे. पण त्यात कुठेही दिवाळीचा उल्लेख नाही. शिवाय, वर एक अरेबियन पद्धतीची कमानही दाखविण्यात आली आहे. तसेच या मॉडेलच्या कपाळावर कोणतीही टिकलीही नाही आणि हास्यही नाही. मात्र नो बिंदी नो बिझनेस या चळवळीचा एवढा प्रभाव पडला आहे की, तनिष्कला आपली ही जाहिरात बदलावी लागली आहे.
From Arabic arches and No bindi to lit brass lamp, bindi and smile! @TanishqJewelry has come a long way in 5 days! #NoBindiNoBusiness pic.twitter.com/51U3DskSqN
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) October 29, 2021
नंतर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत दिवाळीसंदर्भातील वाक्यही जाहिरातीत दिसते तसेच त्या मॉडेलच्या कपाळावर टिकली आणि चेहऱ्यावर हास्य दिसते. ‘प्रकाशाचा उत्सव, चला हा उत्सव साजरा करू ज्याला जीवन असे म्हणतात’ असे वाक्य जाहिरातीत लिहिले आहे.
हे ही वाचा:
बुलढाणा अर्बनची झाडाझडती सुरूच! अशोक चव्हाणांना वाढदिवसाची ‘विशेष भेट’?
मुंबईत सायको किलरकडून दगडाने ठेचून दोघांची हत्या!
पंतप्रधान मोदी जाणार देवभूमीत! बाबा केदारनाथचे घेणार आशीर्वाद
शेफाली वैद्य यांनी स्वतःपुरता हा हॅशटॅग वापरून दिवाळीचा कोणताही उल्लेख टाळणाऱ्या, दिपावली सणाची परंपरा न दाखवता केवळ आपल्या उत्पादनाची कोरडी, निरस जाहिरात करणाऱ्या जाहिरातदारांकडून एकही उत्पादन विकत घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ही भूमिका अनेकांना पटली. त्यातून या मोहिमेने चांगलाच जोर धरला आणि अशी कोरडी जाहिरात करणाऱ्यांची उत्पादने न घेण्याकडे कल वाढू लागला. त्यामुळे अनेकांनी आपल्या जाहिराती बदलल्या. तनिष्कसारख्या टाटा उद्योगसमुहाच्या उत्पादनालाही या मोहिमेपुढे झुकावे लागले आणि लोकांच्या मताचा आदर करावा लागला.
पु.ना. गाडगीळच्या जाहिरातीतही अशीच मॉडेल टिकली न लावता दाखविण्यात आली होती, ती जाहिरातही नंतर बदलण्यात आली.