३५ हजाराहून अधिक महिलांकडून अथर्वशीर्षाचे पठण

ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर उपक्रम

३५ हजाराहून अधिक महिलांकडून अथर्वशीर्षाचे पठण

राज्यासह देशभरात गणपतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. सारा परिसर भक्तिमय वातावरणाने प्रसन्न झालेला असताना पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महिलांनी मोठ्या संख्येने जमून अथर्वशीर्ष पठन केले. तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठण केलं आहे. यावेळी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

बुधवार, २० सप्टेंबर रोजी ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३५ हजार महिला एकत्र आल्या होत्या. यावेळी त्यांनी अथर्वशीर्षाचे पठन करून सारे वातावरण प्रसन्न केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे बुधवारी ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३५ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. या विशेष उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून महिलांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. अथर्वशीर्ष पठणच्या कार्यक्रमाला रशियन नागरिकांच्या एका गटाला पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

हे ही वाचा:

तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !

इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजारा एका सामन्यासाठी निलंबित !

अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !

गेल्या ३५ वर्षांपासून सामूहिक अथर्वशीर्ष पठणचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात महिलांनी गणरायाच्या नामाचा जयघोष सुरू करत या कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात केली. या विशेष उपक्रमामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात वातावरण प्रसन्न झाले होते. गेल्या ३५ वर्षांपासून अथर्वशीर्ष पठणचा कार्यक्रम होतो असून अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाचे हे ३६ वे वर्ष होते. अनेक महिला गेले कित्येक वर्षांपासून अथर्वशीर्ष पठणसाठी हजेरी लावतात.

Exit mobile version