27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरधर्म संस्कृतीजी- २० साठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना ASK G.I.T.A. देणार प्रश्नांची उत्तरे

जी- २० साठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना ASK G.I.T.A. देणार प्रश्नांची उत्तरे

२० परिषदेच्या मंडपामध्ये एआय चॅटबॉटची उभारणी

Google News Follow

Related

भारताचे राजधानीचे शहर दिल्लीमध्ये सध्या जी- २० परिषदेच्या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक देशांचे प्रमुख देशात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये एक एआय चॅटबॉट देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे देशात आलेल्या विदेशी पाहुण्यांना नवा अनुभव घेता येणार आहे.

जी- २० परिषदेची बैठक ९ आणि १० सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी अनेक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिल्लीमध्ये येणार आहेत. तसेच त्यांच्यासोबतच त्यांचे शिष्टमंडळही असणार आहे. या पाहुण्यांसाठी ‘भारत मंडपम’ मध्ये एक एआय चॅटबॉट देखील उभारण्यात आला आहे.

‘ASK G.I.T.A.’ हा एक हायटेक एआय चॅटबॉट आहे. या चॅटबॉटला एखाद्या व्यक्तीने काही प्रश्न विचारल्यास, त्यांची भगवद्गीतेच्या आधारे उत्तरं देण्यात येणार आहेत. “यश कसं मिळवावं?”, “आयुष्यात आनंदी कसं रहावं?” अशा प्रकारचे प्रश्न या चॅटबॉटला विचारता येऊ शकतात. भगवद्गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांनुसार यांची उत्तरं हा चॅटबॉट देणार आहेत. ही उत्तरं हिंदी आणि इंग्रजीमध्ये असणार असतील.

हे ही वाचा:

शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात परतणार

आयआयटीचे संचालक म्हणतात मांसाहारामुळे हिमाचलमध्ये ढगफुटी

उदयनिधीनंतर डीएमकेच्या नेत्याने ओकली गरळ; सनातन धर्माची HIV बरोबर तुलना

१८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. भारत मंडपम मधील ४ आणि १४ नंबरच्या हॉलमध्ये हा चॅटबॉट असणार आहे. प्रगती मैदानावर असणाऱ्या भारत मंडपम मध्ये विशेष ‘डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये २०१४ नंतर भारताने डिजिटल क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात येईल. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाची ही संकल्पना आहे. परदेशी पाहुण्यांसमोर भारतात असणाऱ्या तंत्रज्ञानाची झलक दाखवणं हा यामागचा उद्देश्य असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा