‘वर्षा’ बंगल्यात बाप्पा विराजमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘वर्षा’ बंगल्यात बाप्पा विराजमान

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु असून, धुमधडाक्यात सर्वांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. कुटुंबासह एकनाथ शिंदे यांनी बाप्पाची आरती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचे घराघरात आगमन होत आहे. बाप्पाच्या कृपेने दोन वर्षांनी करोनाचं संकट अखेर दूर झालं आहे. त्यामुळे यंदा आपण गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणेशाचे हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी श्रींच्या चरणी करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

मुंबईतील ‘या’ गणेशोत्सव मंडळाने काढला तीनशे कोटींचा विमा

“दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काय आहे?”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्विट करून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच ट्विटमध्ये पतंप्रधान मोदींनी बाप्पाला नमस्कार करतानाच एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पहिल्यांदाच बाप्पाचं आगमन झालं आहे. दीड दिवसांचा राज ठाकरे यांच्या घरी बाप्पा असणार आहे. कुटुंबियांसह राज ठाकरे यांनी गणरायाची आरती केली आहे. दरम्यान, राज्यात गणेशमंडळासह, राजकीय नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या घरी बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे.

Exit mobile version