सन २००३मध्ये रामजन्मभूमी-बाबरी-मशीद जागेवरील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण आणि उत्खननाचे प्रारंभी नेतृत्व करणारे पुरातत्त्वशास्त्रज्ञ बी.आर. मणी यांनी पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा अहवाल जाहीर करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून सर्व शंका दूर होतील. सत्य लोकांसमोर आले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
श्री रामजन्मभूमी, बाबरी मशिदीच्या जागेच्या इतिहासाबाबत काही विभागांकडून आरोप होत आहे. मात्र सन २००३मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार या जागेच्या उत्खननाचे नेतृत्व करणारे सर्वोच्च पुरातत्वशास्त्रज्ञ बीआर मणी यांनी केंद्र सरकारला अहवाल सार्वजनिक करण्याची विनंती केली आहे. अहवालातील माहिती सर्व टीकाकारांचे तोंड बंद करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने तयार केलेला अहवाल प्रकाशित करणे. जोपर्यंत तो प्रकाशित होत नाही तोपर्यंत लोकांना या जागेचे स्वरूप काय होते आणि त्याला काय महत्त्व दिले गेले होते याची जाणीव होणार नाही,’ असे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक बीआर मणी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितले.
अनेक संशयी आणि समीक्षकांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करूनही त्यांना कलंकित करूनही त्यांनी जवळपास दोन दशके मौन का पाळले, याचे कारणही त्यांनी दिले.’१६ वर्षे मी गप्प राहिलो. मी काहीही बोललो नाही कारण मी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले होते की आम्ही याबद्दल बोलणार नाही. पण आता जेव्हा न्यायालयाने आदेश दिले आहेत, तेव्हा आता आम्ही बोलू शकतो,’ असे ते म्हणाले.
बीआर मणी हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामध्ये असताना त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुरातत्त्व पुराव्यासाठी रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेचे सर्वेक्षण आणि उत्खनन करण्याचे काम सोपवले होते. सुरुवातीला पुरातत्वशास्त्रज्ञ बीआर मणी यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन १२ मार्च २००३ रोजी सुरू झाले आणि ते त्याच वर्षी ७ ऑगस्टपर्यंत चालले. २२ ऑगस्ट २००३ रोजी अहवाल सादर करण्यात आला.
हे ही वाचा:
‘त्या’ वाजुखाना परिसरात शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी
नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, भाजपसोबत युती!
मराठा आरक्षणाच्या मोर्चात चोरट्यांनी लंपास केला पावणे चार लाखांचा ऐवज
हुती दहशतवाद्यांकडून मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्रहल्ला!
इतिहासकार आणि राजकारण्यांनी सांगितले की, आता नष्ट झालेल्या बाबरी मशिदीच्या खाली मंदिर असल्याचा कोणताही पुरावा नाही. काहींनी तर बाबरी मशिदीखाली इतर मशिदी असल्याचा दावाही केला. त्यांच्यापैकी काही जण त्या ठिकाणी काम करणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञांना बदनाम करण्यासाठी पुढे गेले.
“दुर्दैवाने, सांस्कृतिक मंत्रालयाच्या मंत्र्यांनी संसदेत अहवाल प्रसिद्ध केला जाईल असे सांगूनही तो बाहेर आलेला नाही. जोपर्यंत अहवाल प्रकाशित होत नाही तोपर्यंत लोकांची वेगवेगळी मते असतील,’ असे मणी सांगतात. ‘गोष्टी कशा सापडल्या आणि कोणत्या विशिष्ट कालखंडात आहेत हे एकदा समजले की, ज्यांना ते मान्य नाही त्यांनाही शेवटी ते स्वीकारणे शक्य होईल. त्यामुळे अहवाल प्रकाशित करणे हा मुख्य मुद्दा आहे,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली.
प्रभू रामाशी संबंधित मंदिर असल्याच्या सर्वात क्लिष्ट पुराव्यांपैकी एक म्हणजे १२व्या शतकातील विष्णू-हरीचा शिलालेख, ज्यामध्ये विष्णू हरीचे मंदिर कन्नौजचा गहडवाल शासक गोविंद चंद्र यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आले होते, असा उल्लेख आहे. त्यावर सुंदर श्लोक आहेत. तेथे जन्मभूमी शब्दाचा उल्लेख आहे. नंतर त्यात बळीचा वध करणाऱ्या विष्णूचा उल्लेख आहे. त्यामुळे तो निश्चितच प्रभू रामाचा संदर्भ होता,’ असे मणी म्हणतात.