हरिद्वार येथील धर्मसंसद, तसेच दिल्लीतील एक धार्मिक मेळावा, ह्यांमध्ये वक्त्यांनी केलेली भाषणे द्वेषपूर्ण, चिथावणीखोर होती, अशी सर्वत्र टीका होत आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे, या दोन्ही मेळाव्यांत पूर्वाश्रमीचे “वासिम रिझवी” (उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष) जे सध्या हिंदू धर्म स्वीकारून “जितेंद्र नारायण त्यागी” या नावाने ओळखले जातात, त्यांच्याविरुद्ध चिथावणीखोर भाषणे केल्याबद्दल डेहराडून व दिल्ली येथे एफआयआर दाखल केला गेला आहे.
या संदर्भात ७६ ज्येष्ठ विधिज्ञांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर न्यायाधीशांना पत्र लिहून धर्मसंसदेतील चिथावणीखोर वक्तव्यांची स्वतःहून दखल (Suo-Moto cognisance) घेण्याची विनंतीही केली आहे.
वृत्तपत्र माध्यमांतून अर्थातच या विरोधात गदारोळ उठवला जात आहे. एकूण सूर, उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक वैमनस्य वाढवण्याची आणि त्याद्वारे ध्रुवीकरण साधून त्याचा फायदा घेण्याची ही सत्ताधारी भाजपची छुपी चाल असावी, असा आहे. या संदर्भातली उपेक्षिली गेलेली दुसरी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न.
मुळात धर्मसंसद किंवा अन्य तत्सम मेळाव्यात चिथावणीखोर, द्वेषपूर्ण भाषणे करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो आणि तो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून हाताळला जाऊ शकतो. हरिद्वारची धर्मसंसद आणि दिल्लीच्या मेळाव्याबाबत तशी कारवाई (FIR वगैरे) होतच आहे. डेहराडून येथे जितेंद्र त्यागी यांच्या खेरीज अन्य दोघा जणांवरही गुन्हे दाखल केले गेलेत.
पण याउलट, जेव्हा एखादा धर्म, त्याचा सर्वमान्य अधिकृत धर्मग्रंथ हाच इतर धर्मांचा, इतर धर्मीय लोकांचा घाऊक द्वेष करायला शिकवतो, आपल्या अनुयायांना सतत त्यांच्याशी लढायला प्रवृत्त करतो, तेव्हा ती बाब कितीतरी अधिक गंभीर असते.
मुस्लीम धर्म, मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण, गैर मुस्लिमांना अत्यंत हीन लेखतो, मुस्लिमांना इतर धर्मीयांना (काफिर) तुच्छ् लेखण्याची शिकवण देतो. कुराणातील कित्येक आयतींमध्ये तशा तऱ्हेच्या स्पष्ट सूचना / आदेश आहेत. उदाहरणार्थ :
१. पवित्र महिना (रमजान) संपल्यानंतर मूर्तिपूजक जिथे जिथे सापडतील, तिथे त्यांच्या कत्तली करा, किंवा त्यांना पकडून गुलाम करा. पण त्यांनी इस्लाम कबूल करून, नमाज अदा केली, जिझिया कर भरला तरच त्यांना सोडून द्या, कारण अल्ला दयाळू, क्षमाशील आहे ! ( सुरा ९, आयत ५)
२. मूर्तिपूजक हे अपवित्र आहेत . (सुरा ९, आयत २८)
३. सत्य हे आहे, की अल्लावर विश्वास न ठेवणारे हे तुमचे शत्रूच आहेत. (सुरा ४, आयत १०१)
४. श्रद्धाळू जनांनो, अश्रद्ध लोकांशी – मग ते तुमच्या जवळचे असले, तरीही, – लढा, त्यांना तुमच्यातील कठोरता दिसू दे. (सुरा ९, आयत १२३)
५. ज्यांचा (अल्लाच्या) साक्षात्कारावर विश्वास नाही, अशांना आम्ही आगीत भाजून काढू. जसजशी त्यांची त्वचा जळून जाईल, तसतशी नवी त्वचा भाजून त्यांचा छळ केला जाईल, जेणेकरून अल्ला सर्वज्ञ, सर्व सामर्थ्यशाली आहे, हे त्यांना समजेल. (सुरा ४, आयत ५६)
६. श्रद्धाळू जनांनो, प्रत्यक्ष तुमचे वडील, आणि भाऊबंद जर अश्रद्ध असतील, तर त्यांच्याशी मित्रत्व ठेवू नका. अश्रद्ध व्यक्तींशी मैत्री राखणे दुष्कृत्य (पाप) आहे. (सुरा ९, आयत २३)
७. हे प्रेषिता, श्रद्धाळू लोकांना (इतरांशी, अश्रद्ध लोकांशी) लढायला प्रवृत्त कर. वीस निष्ठावान श्रद्धाळू दोनशे अश्रद्धांना भारी पडतील. शंभर निष्ठावान सश्रद्ध असले, तर ते हजार अश्रद्धांवर मात करतील. (सुरा ८, आयत ६५)
८. हे श्रद्धाळू जनांनो, ज्यू आणि ख्रिश्चनांशी मैत्री करू नका. तुमच्यातील जे कोणी ख्रिश्चन / ज्यू लोकांशी मैत्री करतील, ते त्यांच्यापैकीच एक होतील. असे दुष्कृत्य करणाऱ्यांना अल्ला मार्गदर्शन करीत नाही. (सुरा ५, आयत ५१)
९. पवित्र कुराण ग्रंथाची प्रत मिळून सुद्धा, ज्यांचा अल्ला आणि अंतिम दिन (कयामत) यावर विश्वास नसतो, त्यांच्याशी लढा. (सुरा ९, आयत २९)
१०. इस्लामवर श्रद्धा नसलेल्या इतर धर्मियांचा उद्देश हाच असतो, की जसे ते अश्रद्ध आहेत, तसेच तुम्हीही अश्रद्ध बनावे, म्हणजे तुम्ही त्यांच्याच पातळीला याल. त्यामुळे, त्यांच्याशी तोपर्यंत मैत्री करू नका, जोपर्यंत ते इस्लाम स्वीकारत नाहीत, अल्लासाठी घरादाराचा त्याग करत नाहीत. तसे न केल्यास त्यांच्याशी लढा, जिथे मिळतील तिथे त्यांना मारा. त्यांच्याशी मैत्री करू नका, त्यांची मदत घेऊ नका. (सुरा ४, आयत ८९)
११. इतर धर्मियांशी लढा. तुमच्या माध्यमातून अल्ला त्यांना धडा शिकवील, अल्ला त्यांना पराभूत करून, तुम्हाला निश्चित त्यांच्यावर विजय मिळवून देईल. (सुरा ९, आयत १४)
हे ही वाचा:
आठवी पास पठ्ठ्याने ३० हजारांत बनवली फोर्ड कार
टीम इंडियाला साडेसाती; तिसरी कसोटीही दक्षिण आफ्रिकेने सात विकेट्सनी जिंकली
व्यावसायिकाला धमकी देण्यासाठी वापरला थेट अजित पवारांचाच मोबाईल नंबर
पतंगाने घेतला दोन लहान मुलांचा बळी
ही केवळ नमुन्यादाखल उदाहरणे आहेत. कुराणात अशी असंख्य वचने आहेत. कुराणातील या वचनांमध्ये अगदी स्पष्टपणे अशा आज्ञा / आदेश आहेत, जे इतर धर्मीयांबद्दल मुस्लिमांच्या मनात शत्रुत्व, द्वेषभावना, कटुता, निर्माण करतात आणि हिंसेला उत्तेजन देतात. आज जगभरात पसरलेल्या जिहादी दहशतवादी इस्लामी कट्टरतेचे मूळ ह्या कुराण वचनांत सापडते.
त्यामुळे, धर्मसंसद किंवा इतर मेळाव्यांमध्ये चिथावणीखोर भाषणे करणाऱ्यांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करणे जितके महत्वाचे आहे, तितकेच ह्या चिथावणीखोर धर्मग्रंथांची (निदान त्यातील अशा आक्षेपार्ह भागाची) ही दखल घेणे आवश्यक आहे. ही आहे, या प्रश्नाची उपेक्षिली गेलेली दुसरी बाजू.
राज्य घटनेतील अनुच्छेद २५ नुसार दिलेल्या धर्म स्वातंत्र्याच्या आधारे, कुराणातील अशा द्वेषपूर्ण, चिथावणीखोर आयतींना वगळण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच फेटाळली होती. (वासिम रिझवी, जे सध्या हिंदू धर्म स्वीकारून जितेंद्र नारायण त्यागी झाले आहेत, त्यांनीच ही याचिका केली होती.)
नुसत्या वरवरच्या तात्कालिक उपायांपेक्षा, समस्येच्या मुळावर घाव घालायचा असेल, तर कुराणातील अशा आयतींची सखोल, उच्चस्तरीय कायदेशीर चिकित्सा / तपासणी करावीच लागेल. ही वचने भारतीय संविधानाशी, त्यातील तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहेत. हे घटनेतील तरतुदी पाहिल्यास सहज लक्षात येते.
- अनुच्छेद २५ : मुळात अनुच्छेद २५ नुसार घटनेने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा “सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या अधीन राहूनच उपभोगायचे आहे, तसेच धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या अधिकाराला, सर्व व्यक्ती (त्यात इतर धर्मीय ही आलेच) सारख्याच हक्कदार आहेत” – हे ही अनुच्छेद २५ मध्ये स्पष्टपणे नमूद आहे.
- अनुच्छेद ५१ क. : यामध्ये सर्व नागरिकांसाठी “मुलभूत कर्तव्ये” दिलेली आहेत. त्यामध्ये, ५१ (क) (च) : असे आहे – “आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वर्षाचे मोल जाणून तो जतन करणे.”
यावरून कोणाच्याही सहज लक्षात येईल की, कुराणातील काही वचने / आज्ञा या भारतीय राज्यघटनेतील अंगभूत तत्त्वांच्या पूर्णपणे विसंगत अशा आहेत. भारतीय संविधान आणि कुराणातील उपदेश पूर्णतः परस्पर विरोधी (Mutually Exclusive) आहेत. दोन्हींचे एकाच वेळी अनुपालन शक्य नाही. इस्लामची शिकवण भारतीय संविधानाशी सुसंगत (Compatible) नाही. ही खरी समस्या आहे.
“सांप्रदायिक सद्भाव” टिकवताना त्यात संविधानातील मुलभूत तत्त्वांशी तर तडजोड केली जात नाही ना ? ते बघावेच लागेल. केवळ “सांप्रदायिक सद्भाव” टिकवण्यासाठी राज्यघटनेच्या मुलभूत चौकटीला, तत्त्वांना धक्का पोचणार नाही, याची काळजी घ्यावीच लागेल.
त्यामुळे, सर्वोच्च न्यायालय जर वरील ७६ विधिज्ञांनी लिहिलेले पत्र विचारात घेणार असेल, तर त्याच बरोबर कुराणातील आक्षेपार्ह वचने वगळण्यासाठी वासिम रिझवी (जितेंद्र नारायण त्यागी) यांनी केलेल्या याचिकेचाही पुनर्विचार क्रमप्राप्त ठरेल.
– श्रीकांत पटवर्धन