26 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरधर्म संस्कृतीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती; याचं दिवशी करोडो हिंदूंची झाली होती स्वप्नपूर्ती!

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती; याचं दिवशी करोडो हिंदूंची झाली होती स्वप्नपूर्ती!

तीन दिवस साजरा होणार वर्धापन दिन

Google News Follow

Related

अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तिथीनुसार आज संपन्न झाला होता. या भव्य सोहळ्याला एक वर्ष पूर्ण झाले असून याचं दिवशी करोडो हिंदूंची स्वप्नपूर्ती झाली होती. वर्षपूर्तीनिमित्त अयोध्येमध्ये श्री रामजन्मभूमी ट्रस्टने हा विशेष सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला जाणारा तीन दिवसांचा वर्धापन दिन सोहळा शनिवारपासून सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या महोत्सवाचे उद्घाटन करणार असून ते रामलल्लाला अभिषेक करतील आणि महाआरती करतील.

२२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला अयोध्येत त्यांच्या भव्य अशा मंदिरात विराजमान झाले. त्या वर्षीच्या शुभ मुहूर्तानुसार, यावेळी प्रतिष्ठा द्वादशी सण ११ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. याबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ११ ते १३ जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून अंगद टीला येथे रामलल्लाच्या भक्तांना भोग प्रसादाचे वाटप केले जाईल. प्रतिष्ठा द्वादशी कार्यक्रमाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केले जाईल.

वर्षभरापूर्वी अयोध्येत सुमारे ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली होती. मंत्रोच्चार आणि शंख फुंकत पंतप्रधान मोदींनी राम लल्लाला अभिषेक केला. भगवान रामलला त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान मोदींनी २२ जानेवारी सोमवार रोजी १२ वाजून २९ मिनिटांच्या या शुभ मुहूर्तावर प्रभू रामलल्लाला अभिषेक घातला. यानंतर अयोध्यानागरी जय श्री राम-नामाच्या घोषणांनी दुमदुमली. यानंतर राम मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या दिवशी देशभरात आनंदाचे वातावरण होते. अयोध्येत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. देशभरातील अनेक प्रतिष्ठित दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

हे ही वाचा : 

श्रीराम कृपेने मिळाली सजावटीची सौंदर्यदृष्टी!

राजकीय जीवन काही लोकांच्या नशिबात असते, त्यांना काहीही करावे लागत नाही!

प्रयागराज महाकुंभात साडेतीन वर्षांचा श्रवण बाळ!

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ‘जयंती फलक’ लावण्याचा शासनाचा निर्णय!

पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, राम मंदिर परिसर ५० क्विंटलहून अधिक फुलांनी सजवला जात आहे. संपूर्ण मंदिर परिसरात भव्य रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शनिवारपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी पोलिस आणि प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांव्यतिरिक्त, कार्यक्रमाची भव्यता लक्षात घेऊन मार्ग बदल देखील केले जातील. सुरक्षेसाठी एटीएस टीमही तैनात करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा