कर्नाटक: खोदकामात सापडली राम लल्लासारखी प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग!

रायचूर जिल्ह्यातील देवसुगुर कृष्णा नदीच्या पात्रात सापडल्या मूर्ती

कर्नाटक: खोदकामात सापडली राम लल्लासारखी प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग!

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात खोदकामादरम्यान एक प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहे. रायचूर जिल्ह्यातील देवसुगुर गावातून कृष्णा नदी वाहते.नदीवर पूल बांधण्याचे काम चालू आहे.पुलाच्या बांधकामा दरम्यान ह्या मूर्ती सापडल्या आहेत.या अगोदरही पूल बांधण्याच्या कामात हिंदू देवतांच्या शतकानुशतके जुन्या मूर्ती सापडल्या आहेत.

कर्मचाऱ्यांनी नदीतून मूर्ती सुरक्षितपणे बाहेर काढल्या आणि तातडीने स्थानिक प्रशासनाला माहिती दिली.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सापडलेल्या मूर्तींमध्ये भगवान कृष्णाची दशावतार स्वरूपात मूर्ती आहे आणि एका शिवलिंग मूर्तीचा समावेश आहे. नदीपात्रात सापडलेली मूर्ती ही अयोध्येत विराजमान झालेल्या प्रभू रामलल्लाच्या मूर्तीसारखी असल्याचे काहींनी सांगितले.

हे ही वाचा:

उत्तरप्रदेश: आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी भाजपसोबत युती करण्याच्या मार्गावर?

‘काँग्रेसने नेतृत्वासाठी नेहरू-गांधी यांच्याशिवाय विचार करावा’

नितीश कुमारांनी सोडली साथ, पवारांची ‘पॉवर’च हिरावली

पुढील अधिवेशनात राजस्थान स्वतःचे समान नागरी विधेयक आणणार!

मूर्तीच्या सभोवतालच्या पीठावर मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांच्यासह भगवान विष्णूच्या दहा अवतारांचे प्रतिनिधित्व केले आहे.या संदर्भात डॉ. पद्मजा देसाई यांनी ही माहिती दिली. डॉ. पद्मजा देसाई ह्या व्याख्याता, प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्रकार आहेत.

Exit mobile version